नरेश रहिले/ सोशल कनेक्ट
गोंदिया : कोरोनाचे जगावर संकट आले. यातून गोंदिया कसा सुटणार? कोरोनाने पालक हिरावून घेतले अशा पाल्यांना आधार देण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना, अधिकारी पुढे आले. यात ज्या शाळांनीही आपली सामाजिक बांधीलकी जपत आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे आई-वडील कोरोनाने मृत्यू पावले अशा विद्यार्थ्यांचे तीन वर्षांसाठी शैक्षणिक शुल्क माफ केले. जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांचे ६ लाख २५ हजार ३८० रुपये शैक्षणिक शुल्क २२ शाळांनी माफ केले आहे.
जिल्ह्यात कोविडने मृत्यू पावलेल्या पालकांची ३६ बालके खासगी शाळेत शिकत आहेत. या शाळांनी या निराधारांना आधार देण्यासाठी यंदापासून पुढील तीन वर्षांपर्यंतचे शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. फुलचूर येथील फुंडे सायन्स ॲण्ड आय.टी. ज्युनिअर कॉलेजने ७ हजार, आदर्श कॉन्व्हेंट ॲण्ड इंग्लिश हायस्कूल आरटीओ ऑफिसजवळ गोंदिया २२ हजार ४८० रुपये, भारतीय ज्ञानपीठ, बॅंक कॉलनी लोहिया वॉर्ड गोंदिया १६ हजार ३२५ रुपये, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल गोंदिया १४ हजार, ओर्किड इंटरनॅशनल पब्लिक स्कूल सूर्याटोला १४ हजार ४००, गुजराती नॅशनल स्कूल रेलटोली ४३ हजार ८०० रुपये, विमलताई सायन्स ज्युनियर कॉलेज कटंगी नाका २७० रुपये, श्रीमती जे. एम. व्ही. इंग्लिश प्रायमरी स्कूल रेलटोली गोंदिया ४१ हजार, श्रीमती जे. एम. वसंत इंग्लिश प्रायमरी स्कूल गोंदिया ३७ हजार, आदिवासी विकास हायर सेकंडरी स्कूल खजरी ५ हजार ५००, नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज जमनापूर ५ हजार, श्री कमलाकरराव केशवराव इंगळे ज्युनिअर काॅलेज गोंदिया ३० हजार, साकेत पब्लिक स्कूल गोंदिया ५७ हजार १०० रुपये, श्रीमती आनंदीदेवी गोपीलाल अग्रवाल महावीर मारवाडी इंग्लिश प्रायमरी स्कूल फुलचूर ७ हजार २०० रुपये, विवेक मंदिर स्कूल गोंदिया १ लाख ५९ हजार ८०० रुपये, चंचलबेन मनीभाई पटेल स्कूल गोंदिया ४९ हजार ९३० रुपये, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट सिव्हील लाईन गोंदिया १९ हजार ५००, ॲक्साविर हायस्कूल गोंदिया ३० हजार ७५ रुपये, शारदा कॉन्व्हेंट गोंदिया १९ हजार, सीता पब्लिक स्कूल सुरतोली ९ हजार, ख्रिस्तानंद पब्लिक स्कूल रेल्वे स्टेशन रोड रिसामा आमगाव ३७ हजार व संस्कार इंग्लिश प्रायमरी स्कूल गोंदिया १० हजार रुपये माफ केले आहेत.