शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

63.68 टक्के पदवीधरांनी बजाविला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:00 AM

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती.  देवरी तालुक्यात ७३.३१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७१.४ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देमतदान केंद्रावर गर्दी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता, बऱ्याच मतदान केंद्रावर सायंकाळी उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१) मतदान घेण्यात आले. यासाठी जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदारांपैकी १०७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून त्याची टक्केवारी ६३.६८ आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा सुरुवातीपासूनच चूरस दिसून आली. या पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. जवळपास सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला होता. मतदारांमध्ये सुध्दा या निवडणुकीबद्दल उत्साह दिसून आला. जिल्ह्यातील २५ ही मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी ८ वाजतापासूनच मतदान करण्यासाठी गर्दी दिसून आली. तर गोंदिया येथील मतदान केंद्रावर सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत मतदारांची गर्दी होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरुच होती. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती.  देवरी तालुक्यात ७३.३१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७१.४ टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. त्यात गोंदिया तालुक्यात ९, तिरोडा ४, आमगाव २, गोरेगाव २, सालेकसा १, सडक अर्जुनी २, देवरी २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात २ मतदान केंद्र  होते. एकंदरीत जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

मोबाईल नेण्यास मनाईमतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या आत मोबाईल घेवून जाण्यास मनाई करण्यात आली होती. यासाठी मतदान केंद्राच्या प्रवेशव्दारावर मोबाईल जमा करण्यासाठी एक कांऊटर उघडण्यात आले होते. तिथे सर्वांचे मोबाईल जमा करुन ठेवले जात होते. मतदान करुन परत आल्यानंतर मोबाईल परत दिले जात होते. चोख पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर मतदान केंद्राच्या परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मतदान केंद्राच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तर मतदान केंद्राच्या परिसरात बूथ लावण्यास किवा होर्डिंग, बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली होती. 

हॉयटेक निवडणूक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा प्रथमच हॉयटेक दिसून आली. मतदारांना त्यांच्या माेबाईलवर मतदार स्लीप, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीतील क्रमांक आदी पाठविण्यात आले होती. सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी ही व्यवस्था केली होती. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुध्दा या निवडणुकीचा प्रचार केला जात होता. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रथमच हॉयकेट दिसून आली. नक्षलग्रस्त भागात मतदानाची टक्केवारी वाढलीपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चांगली चूरस दिसून आली. यापूर्वी झालेल्या या निवडणुकीसाठी ऐवढा उत्साह मतदारांमध्ये दिसत नव्हता. मात्र कोरोनाच्या सावटाखाली निवडणूक होवून सुध्दा मतदान करण्यासाठी पदवीधर बाहेर पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात ७१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता कोरोनाच्या सावटाखाली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडल्याने मतदान केंद्रावर संसर्ग टाळण्यासाठी पूरेपूर काळजी घेण्यात आली. मतदान केंद्राच्या प्रवेशव्दारावरच मतदारांची थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सीजन लेव्हल तपासले जात होते. शिवाय मतदारांचे सॅनिटायझेशन करण्यात येत होते. तर प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर हॅन्डग्लोज देण्यात येत होते. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेतली जात होती. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक