शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
2
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
3
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
4
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
5
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
6
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
7
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
8
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
9
"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान
10
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
11
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
12
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
13
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
14
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
15
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
16
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
17
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
18
बाॅम्बच्या धमक्यांमुळे विमान प्रवासाची बोंबाबोब; DGCA प्रमुख विक्रम देव दत्त यांची उचलबांगडी
19
दिवाळीत कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी उपाय
20
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

दोन दिवसात जि.प.साठी ६५ नामांकन

By admin | Published: June 14, 2015 1:52 AM

जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह व सर्व आठ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आॅनलाईन नामांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे.

रविवारीही कामकाज सुरू : सर्व तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकगोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह व सर्व आठ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आॅनलाईन नामांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे. बुधवारपासून नामांकन दाखल करण्याची मुभा असली तरी शुक्रवारी पहिले नामांकन दाखल झाले. शनिवारी त्यात आणखी भर पडली. दोन दिवसात जिल्हा परिषदेसाठी ६५ तर पंचायत समित्यांसाठी ७१ नामांकन दाखल झाले आहेत.नामांकन दाखल करण्यासाठी सोमवार दि.१५ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे रविवारीसुद्धा (दि.१४) नामांकन दाखल करून घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचन गणांकरीता निवडणुक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यात गोंदिया तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संजय पवार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.के. वालकर यांचा समावेश आहे.आमगाव तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी प्राशांत काळे, सहायक निवडणूक अधिकारी तहसलीदार राजीव शक्करवार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सी.डी. मून, सालेकसा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, स.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार एन.जे. उईके व अतिरिक्त स.निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.एन वाघाये, गोरेगाव तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी बकुलराव घाटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार बी.आ. बांबोळे तर अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे, तिरोडा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रविंद्र चव्हाण व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सडक-अर्जुनी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शोभाराम मोटघरे व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी आर.जे. धांडे, देवरी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीदार संजय नागटिळक व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.एन. मेश्राम, अर्जुनी-मोरगाव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी एम.ए. राऊत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार एच.आर. रहांगडाले व अति.स.निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी जी.डी. कोरडे काम पाहतील. (जिल्हा प्रतिनिधी)जात वैधता प्रमाणप्रत्राला सहा महिन्यांची मुदतया निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र यात सुधारणा केली असून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केला असेल परंतू नामनिर्देशन भरण्याच्या तारखेला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशा उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमानपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे उमेदवाराचा अर्ज असल्याचा कोणताही पुरावा सादर करावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द करण्यात येणार आहे.