शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

पावसामुळे ६८ बसफेऱ्या रद्द

By admin | Published: September 14, 2016 12:19 AM

तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.

पुजारीटोलाचे १० गेट उघडले : सालेकसा-देवरी तालुक्यांतील अनेक मार्ग बंदगोंदिया : तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे जलाशयांमधील पाणीसाठा बराच वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले असून त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल. शिवाय काही कमी उंचीच्या पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने एसटी महामंडळाला अनेक मार्गांवरील ६८ फेऱ्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.प्रभारी आगार व्यवस्थापक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे ११, १२ व १३ सप्टेंबर या तीन दिवसपर्यंत सालेकसा तालुक्यातील तब्बल ६८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे बसेसचा दोन हजार ६९० किमीचा प्रवास होवू शकला नसून जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान गोंदिया आगाराला सहन करावे लागले. सालेकसापुढील सर्वच फेऱ्या या तीन दिवसपर्यंत रद्द होत्या. ग्रामीण भागातील काही रस्ते पूर्णत: खराब झालेले असून त्यांची सुधारणा न झाल्याने पाऊस आल्यावर त्या मार्गावरील वाहतूक गोंदिया आगाराला बंद करावी लागते. यात दवनीवाडा, बंजारी, शहारवाणी, सालुटोला-मोहगाव व डव्वा मार्गांचा समावेश आहे. पाऊस आल्यावर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आधीचेच हे मार्ग खराब असून पाऊस आल्यावर या रस्त्यांच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडते. त्यामुळे गोंदिया आगाराला या मार्गांवरील बस वाहतूक बंद करावी लागते. शिवाय या मार्गावर काही कमी उंचीचे पूल असून त्यावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बाधित होते. दवनीवाडा मार्गावर बसफेरी सुरू करण्यात आली होती, मात्र आलेल्या पावसाने रस्ता अधिकच खराब झाल्याचे बसफेरी बंद करावी लागली. बंजारी मार्गावरील फेऱ्या सुरू होणार असल्याचे झाडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात सन २०१२ पासून नियमित आगार व्यवस्थापक नाही. मागील चार वर्षापासून येथे प्रभारी आगार व्यवस्थापकच कार्यरत होते. मागील आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांचे स्थानांतरण झाल्यानंतर कार्यशाळा अधीक्षक झाडे यांच्याकडे सदर पदाचा प्रभार दिला. त्यामुळे बसफेऱ्या सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहीजे याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. (प्रतिनिधी)