शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

६८२ लोक ५ वर्ष राहणार निवडणूक लढविण्यापासून वंचित

By admin | Published: October 16, 2016 12:17 AM

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाकडे निर्धारित वेळेत निवडणुकीचा खर्च सादर करायचा असते.

सात तालुक्यांतील स्थिती: निवडणुकीचा खर्च सादर केला नाहीगोंदिया : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाकडे निर्धारित वेळेत निवडणुकीचा खर्च सादर करायचा असते. परंतु निवडणुकीचा खर्च मुदतीच्या आत सादर न करणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सात तालुक्यातील ६८२ लोकांना पुढील पाच वर्ष निवडणूक लढविता येणार नाही. यात अनेक ग्राम पंचायत सदस्यांचा समावेश आहे.महाराष्ट्र ग्राम पंचायत (निवडणूक) नियम, १९५९ अंतर्गत ग्राम पंचायत सार्वत्रिक, पोट निवडणूक २०१५ अन्वये निवडणूक २५ जुलै २०१५ रोजी घेण्यात आली. त्याची मतमोजणी २७ जुलै रोजी करण्यात आली. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नाम निर्देशन पत्रासोबत निवडणूक खर्चाचा हिशेब निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याकडे लेखी हमीपत्र, शपथपत्र सादर करायला पाहिजे. परंतु निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुका वगळता गोंदिया जिल्ह्यातील सात तालुक्यातील ६८२ लोकांनी निवडणुकीचा खर्च सादर केला नाही. परिणामी त्यांना २२ जून २०१६ पासून पुढील पाच वर्षापर्यंत निवडणूक लढविता येणार नाही, असे निवडणूक विभागाने जाहीर केले आहे. यात सालेकसा तालुक्यातील २५ उमेदवार, सडक अर्जुनी तालुक्यातील १०७ उमेदवार, गोंदिया तालुक्यातील ६५ उमेदवार, देवरी तालुक्यातील १७३, आमगाव तालुक्यातील १०३, गोरेगाव तालुक्यातील १२२ तर तिरोडा तालुक्यातील ८७ असे एकूण ६८२ उमेदवार पुढील पाच वर्ष निवडणूक लढवू शकणार नाही. (तालुका प्रतिनिधी)ग्रा.पं.सदस्यांची माहिती निवडणूक विभागाकडे नाहीखर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांची सरसकट यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केली. परंतु ६८२ या उमेदवारांमध्ये किती लोक निवडून आले. त्यांची माहिती निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्यामुळे हे विभाग किती उदासीन आहे याची प्रचिती येते. संबंधित तहसीलदारांकडे ही माहिती असावी आमच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही असा सूर तेथील कर्मचाऱ्यांचा आहे. कुंभारटोलीच्या निरु फुले यांचे सभासदत्व रद्दआमगाव तालुक्यातील पदमपूर जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कुंभारटोली येथील निरु शशीकांत फुले यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांनी निवडणूक लढवून ग्राम पंचायतचे सदस्यत्व प्राप्त केले. परंतु निवडणूक विभागाला निवडणुकीचा खर्च सादर करण्यास त्या असमर्थ ठरल्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले.