गोंदिया: रेल्वे सुरक्षा बल गोंदियाच्या जवानांनी पुरी-सूरत एक्सप्रेसमधून लाखो रुपयाचा गांजा जप्त केला. ही कारवाई १ मे रोजी करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्यात होणाऱ्या निवडणुकीला घेऊन आरपीएफ गोंदियाचे प्रभारी निरीक्षक विनोदकुमार तिवारी यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गोंदिया स्टेशन परिसरात व प्रवासी गाड्यांमधून अवैध मादक पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी ‘ऑपेरशन नार्कोस’ चालवित होते. जवानांनी गाडी क्रमांक २२८२७ पुरी-सूरत साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस गोंदिया स्टेशन प्लेटफार्म ३ वर दुपारी ३:४० वाजता येताच गाडीच्या मागील जनरल डब्याची तपासणी केली. त्यात एका काळ्या रंगाची ट्रॉली बॅग संशयास्पद दिसली.
त्या कोचमधधील प्रवाश्यांना बॅग संदर्भात विचारणा केल्यावर कोणत्याही प्रवाश्याने ती बॅग आपली आहे हे सांगितले नाही. त्या बॅगमध्ये खाकी रंगाच्या दोन पॅकेटमध्ये गांजा आढळला. ७ किलो २४२ ग्रॅम वजनाचा तो गांजा आहे. त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे ७३ हजार रूपये आहे. गोंदिया रेल्वे पोलिसांनी एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात आरपीएफ गोंदियाचे प्रभारी निरीक्षक विनोदकुमार तिवारी यांच्या नेतृत्वात आरक्षक विवेक कनौजिया, प्रधान आरक्षक राजेंद्र रायकवार, महिला आरक्षक ज्योतिबाला, आरक्षक अमित राठी व आरपीएफच्या अपराध गुप्तचर शाखा गोंदियाच्या जवानांनी केली आहे.