गोंदिया:
शहरातील आरोपी मुकेश रामाजी सार्वे (३५) याने एका १३ वर्षाच्या मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ७ वर्षाचा सश्रम कारावास व २२ हजार रूपये दंड ठोठावला. ही सुनावणी २८ मार्च रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली आहे.गोंदिया शहरातील मुकेश रामाजी सार्वे (३५) याने २७ मार्च २०१९च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास १३ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले होते. पिडीत मुलगी आपल्या घरी समोरच्या वऱ्हांड्यात तिच्या आजी सोबत झोपली असतांना आरोपी तिच्या घरी अनाधीकृतपणे प्रवेश करून तिचे अंतरवस्त्र काढण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा पिडीता जोराने ओरडली त्यामुळे घरचे लोक जागे झाले. यावेळी आरोपीला पळून गेला. पिडीतेच्या वडीलाने गोंदिया शहर पोलीसात आरोपी विरूधञद तक्रार केली. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ८, भादंविचे कलम ३५४, ३५१ अतंर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपीविरूध्द दोष सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकूण ४ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक सुर्यवंशी यांच्या देखरेखीत पैरवी अधिकारी महीला पोलीस हवालदार टोमेश्वरी पटले यांनी काम पाहिले.
अशी झाली शिक्षा
कलम ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे ३ वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिनाचा अतिरिक्त कारावास, कलम ३५४ प्रमाणे ३ वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिनाचा अतिरिक्त कारावास, कलम ३५१ भादंवि प्रमाणे १ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड ठाेठावला, दंड न भरल्यास १ महिनाचा अतिरिक्त कारावास, एकुन ७ वर्षांचा सश्रम कारावास व २२ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली व दडांच्या रकमेपैकी २१ हजार रूपये पिडीतेला देण्याचा आदेश दिले.