लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : नामांकन परतीनंतर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले अूसन यासाठी ७३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंचपदाची थेट मतदारांमार्फत प्रथमच निवडणूक होत असल्याने सर्व शक्ति पणाला लावली जात असल्याचे चित्र आहे.येरंडी/दर्रे व गोडवागाव ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. चापटी ग्रा.पं.साठी सरपंचपदाचा एकमेव उमेदवार आहे. तर अरुणनगर येथे सरपंचपदासाठी राखीव असलेल्या प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने सरपंच पदासाठी एकही नामांकन अर्ज नाही.तालुक्यात १६ आॅक्टोबरला ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. येरंडी/देवलगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ असल्याची तक्रार झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने २१ सप्टेंबर रोजी येथील निवडणुकीची प्रक्रिया रद्द केली. या ग्रामपंचायतसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम यशावकाश स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे. उर्वरित ३९ ग्रामपंचायतसाठी ३९ सरपंच व ३३१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी एकूण १९० तर सदस्यांसाठी ७८६ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. यात येरंडी/दर्रे, गोठणगाव व चापटी ग्रामपंचायतचे सरपंच अविरोध निवडून आले. शिवाय ४३ सदस्य अविरोध निवडून आले आहेत.गुरुवारी पार पडलेल्या उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी सरपंच पदाच्या ३१ व सदस्यांच्या ९३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. शेवटी सरपंच पदासाठी ११६ व सदस्यांसाठी ६१७ असे एकूण ७३३ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यात सर्वाधिक चुरस नवेगावबांध ग्रामपंचायतसाठी आहे. येथे सरपंचपदासाठी तब्बल १० तर सदस्यांसाठी ६८ उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत.ढिसाळ प्रशासन३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुकांना घेवून प्रशासन गंभीर नाही. तालुका प्रशासन निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी निवडणुक निर्णय अधिकाºयांवर घालत आहे. निवडणुकीची इत्यंभूत माहिती संकलीत करुन वरिष्ठांना व प्रसार माध्यमांना पुरविण्याची जबाबदारी निवडणूक अधिकाºयांची असते मात्र चक्क निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे वोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम सुरु आहे. निवडणुकीचे काम करणाºया कर्मचाºयांना स्वत: पिण्याचे पाणी घ्यावे लागते. याठिकाणी तहसील कार्यालयाचा एकही कर्मचारी उपस्थित राहात नाही. आवश्यक असलेले फॉर्म वेळेवर पुरविले जात नाही व वेळेवर माहिती सूचनाफलकावर लावली जात नाही. त्यामुळे उमेदवारात नैराश्य आहे. नायब तहसीलदार (निवडणूक) भानारकर हे उडवाउडवीची उत्तरे देतात याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.येरंडी/दर्रेचा कारभार महिलांच्या हातीखेडेगावात निवडणुकीची अधिक चुरस असते असे म्हणतात. पण येरंडी/दर्रे व गोठणगाव याला अपवाद आहेत. ९५ कुटुंबसंख्या व ४१० लोकसंख्या असलेले आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील अशी बिरुदावली असलेले येरंडी/दर्रे घनदाट जंगलात वसलेले गाव आहे. या गावाने महिला सरपंच व संपूर्ण महिला सदस्यांची अविरोध निवड करुन गोंदिया जिल्ह्यात आदर्श निर्माण केला. या गावाने गतवर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय पुरस्कार प्राप्त केला असून त्यांना चार लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. आता या गावाचा कारभार महिलाच सांभाळणार आहेत. ही एक आदर्श व नवसंकल्पना बोध घेणारी म्हणावी लागेल. निवडून आलेल्या महिलांमध्ये मनिषा प्रकाश शहारे (सरपंच), सदस्यांमध्ये सोनिया तुलाराम वाढई, नंदा संदीप जुनाके, गिता हेमराज वाढई, बेबी खेमराज मारगाये, मंदा प्रशांत शहारे, पारबता कमलदास मिरी, जिजा सुनील सोनवाने यांचा समावेश आहे.
३९ ग्रामपंचायतीसाठी ७३३ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 11:58 PM
नामांकन परतीनंतर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले अूसन यासाठी ७३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ठळक मुद्दे४३ सदस्य अविरोध : येरंडी/दर्रे व गोडवागाव ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध