लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली-निजामुद्दीम येथे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना गोंदिया येथील आयुवेर्दीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्यांना सुध्दा येथे ठेवण्यात आले असून सध्या अशा एकूण ७४ जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर ५९ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर हायअर्लट करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या कालावधीत दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवास करणारे काही प्रवाशी सुध्दा या नागरिकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अशा प्रवाशांचा शोध घेवून त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम जिल्हा आणि आरोग्य विभागातर्फे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या कालावधीत प्रवास करणाºया एकूण ३७ प्रवाशांची ओळख पटली असून या सर्वांना कुडवा परिसरातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने या सर्वांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. तर गोंदिया येथील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले होते. या बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांना सुध्दा आयुवेर्दीक महाविद्यालयात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. यांचेही नुमने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचासुध्दा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाला जिल्ह्यातील ५९ जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.२५५ जण देखरेखेखालीजिल्ह्यात विदेशातून प्रवास करुन आलेल्या एकूण प्रवाशांची संख्या २२२ होती. तर या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या ९३१ ऐवढी होती. मात्र यापैकी ७७ प्रवाशांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यामुळे आता विदेशातून आलेले प्रवाशी व त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण २५५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे.बाधीत युवकाच्या प्रकृतीत सुधारणाशहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे २७ मार्चला स्पष्ट झाले. त्यानंतर युवकाला आरोग्य विभागाने येथील शासकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागील सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आत्तापर्यंत १७ जणांचे नमुने निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १८ जणांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १८ जणांचे रिर्पोट प्राप्त झाले असून १७ जणांचे नमुने निगेटिव्ह तर १ नमूना पॉझिटिव्ह आढळला.जिल्ह्यात कोरोना बाधीत नवीन रुग्णांची नोंद आत्तापर्यंत झालेली नाही.
गोंदिया जिल्ह्यातील ७४ जणांना केले रुग्णालयात क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 9:52 PM
एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली-निजामुद्दीम येथे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना गोंदिया येथील आयुवेर्दीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
ठळक मुद्दे५९ जणांचे अहवाल अप्राप्त २५५ जण प्रशासनाच्या देखरेखेखाली