शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृद्धीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:11 PM

जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : सडक-अर्जुनी तालुक्यातील तीन गावांचे काम प्रगतीपथावर

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :जलसंवर्धनाच्या कामातून कायमस्वरुपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचे पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम दिसून आले. जिल्ह्यात २०१६-१७ या कालावधीत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यातील ७४ गावे जलसमृध्दी होण्याच्या मार्गावर आहेत.शासनाची महत्त्वपूर्ण व महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात कोट्यवधींची कामे करण्यात आली. या अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी ७४ गावे ९० ते १०० टक्के जलसमृद्ध झाली आहेत. तर उर्वरित तीन गावांमध्ये ५० ते ८० टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली होती. यातील सर्व १० ही गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात फुलचूर, चंगेरा, फतेपूर, घिवारी, सोनबिहरी, दासगाव खुर्द, तेढवा, धामनगाव व दतोरा या गावांचा समावेश आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांची भूजल पातळी वाढविण्यात यश आले आहे. यात पाथरी, सोनेगाव, सिलेगाव, बघोली, सोनी, कालीमाटी,आंबेतलाव, दवडीपार, नोनीटोला, चांदीटोला या गावांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसमृद्धीसाठी तिरोडा तालुक्यातील ९ गावांची निवड झालेली होती. यात सोनेगाव, नहरटोला, मुंडीपार, नवेगाव, करटी बु., पालडोंगरी, मरारटोला, चिखली व लोणार या गावांचा समावेश आहे. सर्व जलसमृद्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातही निवडलेली ९ गावे जलसमृद्ध झाली आहेत. यात सावरटोला, करडगाव-तिडका, बोळदे-करड, परसोडी, गुडरी, डोंगरगाव-कवठा, भिवखिडकी, पिंपळगाव, बोंडगावदेवी या गावांचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातही ९ गावांची निवड करण्यात आली होती. यात बघेडा, गोसाईटोला, जांभुळटोला, सरकारटोला, सुपलीपार, भजियापार, डोंगरगाव, जांभखरी, बोरकन्हार या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाली आहेत. देवरी तालुक्यातील निवड झालेल्या ११ गावांमध्ये कोसबी खुर्द, परसोडी, आलेवाडा, कडीकसा, फुटाना, चिल्हाटी, धमदीटोला, घोनाडी, म्हैसुली, बाळापूर, धवलखेडी या गावांचा समावेश असून ते जलसमृद्ध झाले आहेत. तसेच सालेकसा तालुक्यातील निवड झालेले मुरकूडोह, दंडारी, पांढरवाणी, कलरभट्टी, मानागड, कोसमतरा, हलबीटोला व गांधीटोला या गावांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यात गोपालटोली, घटेगाव, पुरकाबोडी, कनेरी, सडक-अर्जुनी, मालीजुंगा, मोगर्रा, गोंगले, मुरपार व पळसगाव या गावांची निवड करण्यात आली होती.यापैकी गोंगले, मुरपार व पळगाव ही तीन गावे वॉटर न्युट्रल झालेली नाहीत. यापैकी एका गावात ८० ते ९० टक्के व दोन गावांत ५० ते ८० टक्के कामे झाली आहेत.२०.५१४ टीसीएम जलसाठाजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण दोन हजार ६६६ कामे करायची होती. यापैकी दोन हजार ४८६ कामे पूर्ण झाली असून १८० कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. यात कृषी विभागाच्या एक हजार ८०६ कामांपैकी एक हजार ६९४ कामे पूर्ण झाली असून ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत झालेल्या कामांवर ३२.५१ कोटी रूपये खर्च झालेले असून पूर्ण झालेल्या कामांमुळे जिल्ह्यात २०.५१४ टीसीएम जलसाठा निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.