लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना योद्धा असणाऱ्या पोलिसांना कोरोनाशी लढा देणारी लस देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील ७५.३९ टक्के पोलिसांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत १२१ अधिकारी व २,१०१ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ७५ टक्के पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यातील १२१ पोलीस अधिकाऱ्यांपैकी ६८ अधिकाऱ्यांनी ही लस घेतली आहे. त्यांची टक्केवारी ५६.१९ आहे. पाेलीस कर्मचारी २,१०१ असून, त्यांची टक्केवारी ७५.३९ आहे. १,५८४ कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली असून, उर्वरित २५ टक्के पोलीसही कोरोनाची लस घेणार आहेत. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळ मिळेल, त्यांना तसे-तसे लस घेण्यासाठी सोडले जाते.
बॉक्स
१५.३७ टक्के पोलिसांना दुसरा डोस
गोंदिया जिल्ह्यातील २,१०१ पोलिसांपैकी ३२३ पोलिसांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस घेणाऱ्या पोलिसांची टक्केवारी १५.३७ आहे. १९ अधिकाऱ्यांनीही दुसरा डोस घेतला आहे.
बॉक्स
वेळ मिळताच महिला पोलीसही घेतात लस
१) गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस आस्थापनेवर असलेल्या महिला पोलीसही लस घेत आहेत. त्यांना वेळ मिळाला की, या महिला पोलीस कर्मचारी लस घेण्यासाठी केंद्रांवर पोहोचत आहेत. लसीकरणात गाेंदिया जिल्ह्याच्या महिला पोलीसही मागे नाहीत.
......
२) महिला पोलिसांना दुसरा डोस अजून झालेला नाही. पहिल्या डोस करिताच महिला पोलिसांची लगबग सुरू आहे. वेळ मिळताच पहिला डोस घेतला जात आहे. पहिल्या डोसकरिता अनेक महिला पोलीस प्रतीक्षेत आहेत. दुसरा डोस नंतर घेतला जाणार आहे.
.......
जिल्ह्यातील एकूण पोलीस - २,१०१
जिल्ह्यातील एकूण पोलीस अधिकारी - १२१
लस घेतलेले पोलीस कर्मचारी - १,५८४
लस घेतलेले पोलीस अधिकारी - ६८
.......