शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
2
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
3
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
4
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
5
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
6
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
7
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
9
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
10
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
11
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
12
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
13
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
14
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
15
याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
16
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
17
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
18
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
19
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
20
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

अहिंसा मॅरेथानमध्ये ७६२० स्पर्धक धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 9:28 PM

जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे एक पाऊल उचलण्यात आले. २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अहिंसा मॅरेथान स्पर्धेत धावण्यासाठी ७ हजार ६२० स्पर्धकांनी आपले नाव पोलीस विभागाकडे नोंदविले आहे.

ठळक मुद्दे२१५० महिला घेतील भाग : पुरस्कार वितरण आंतरराष्ट्रीय खेळाडू मोनिका आथरे यांच्या हस्ते

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे एक पाऊल उचलण्यात आले. २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अहिंसा मॅरेथान स्पर्धेत धावण्यासाठी ७ हजार ६२० स्पर्धकांनी आपले नाव पोलीस विभागाकडे नोंदविले आहे.या स्पर्धेत २ हजार १५० महिला भाग घेणार आहेत. कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून आमगाव किडंगीपार रेल्वे क्रॉसिंगपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांना परत मुख्यालयापर्यंत परत यावे लागेल. ६ किमी, २१.०९७ किमीचे अर्ध मॅरेथान व ४२.१९५ किमीचे पूर्ण मॅरेथान आयोजित करण्यात आले आहे.६ किमीच्या स्पर्धेत ३ हजार ५७० पुरूष व १ हजार ६७७ महिला सहभागी होतील. अर्ध मॅरेथानमध्ये १ हजार ७२९ पुरूष व ४३९ महिला तर पूर्ण मॅरेथानमध्ये १७१ पुरूष व ३४ महिलांनी भाग घेतला आहे. ४२ किमी स्पर्धेत वेळेच्या आत येणाऱ्या सर्व स्पर्धकांना मुंबईच्या मॅरेथान स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.ज्या स्पर्धकाचे वय १८ व त्यापेक्षा अधिक असेल त्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. २९ सप्टेंबरपर्यंत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात ३३२ स्पर्धकांनी नोंदणी केली.रामनगर ६००, गोंदिया ग्रामीण ३४६, रावणवाडी ६७२, तिरोडा ४४९, गंगाझरीत २५२, दवनीवाडात ५८७, आमगावात ७३४, गोरेगावात ६५१, सालेकसात ७८९, देवरीत ६०७, चिचगडमध्ये १७०, डुग्गीपारमध्ये ६२७, नवेगावबांध १४९, केशोरीत १४२, अर्जुनी-मोरगावात ५१३ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मॅरेथानच्या खेळाडू मोनिका आथरे उपस्थित राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी सांगितले.गोंदिया-आमगाव रस्ता १२ वाजेपर्यंत बंदआॅक्टोबर रोजी सकाळी ४ ते दुपारी १२ वाजता दरम्यान गोंदिया-आमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे.अत्यावश्यक सेवेसाठी या रस्त्याचा वापर होऊ शकतो. स्पर्धकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पाण्याचे बॉटल ठिकठिकाणी उपलब्ध करून ठेवल्या जातील. रूग्णवाहीका देखील तयार राहणार आहे.बॉक्स४१३ अधिकारी-कर्मचाºयांचा बंदोबस्तअहिंसा मॅरेथान स्पर्धेसाठी ३५३ पुरूष व ६० महिला अश्या ४१३ पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. स्ट्रायकींग फोर्स, घातपात विरोधी पथक, व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे.