लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गुरूवारी (दि.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास गोंदिया शहरासह व तालुक्यतील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. दोन तास पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याचे चित्र होते. गोंदिया मंडळात ७८ मिमी पावसाची नोंद झाली.गोंदिया शहरातील सर्वच रस्ते पावसामुळे जलमय झाले होते. विशेष म्हणजे अंडरग्राऊंड मार्गावर पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. नेहरू चौक ते सिव्हील लाईन, इंगळे चौकापर्यंत जाणाऱ्या मार्गावर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. केवळ गोंदियाच नव्हे तर गोंदिया तालुक्याच्या कामठा येथे ६० मिमी, खमारी मंडळात ४१ मिमी, रावणवाडी मंडळात २६.५० मिमी, रतनारा मंडळात ४३ मिमी पावसाची नोंद झाली. तिरोडा ४१ मिमी, मुंडीकोटा येथे ४० मिमी, अर्जुनी-मोरगाव येथे ४६.४० मिमी, महागाव येथे ५६.४० मिमी, केशोरी येथे ४३.२० मिमी व सौंदड येथे ३२.४० मिमी पावसाची नोंद झाली.जलाशयांमध्ये अद्यापही पुरेसा साठा नाहीजिल्ह्यात चार प्रमुख जलाशये आहेत. यात इटियाडोह जलाशयात २४.६३ टक्के, शिरपूर जलाशयात ४.४७ टक्के, पुजारीटोला जलाशयात २५.८९ टक्के व कालीसरार जलाशयात १७.४४ टक्के पाणीसाठा आहे. सिंचन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जलाशये व नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. मात्र जलाशयांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नसल्याचे सांगितले.
दोन तासांत गोंदिया तालुक्यात ७८ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:37 AM
गुरूवारी (दि.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास गोंदिया शहरासह व तालुक्यतील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. दोन तास पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याचे चित्र होते. गोंदिया मंडळात ७८ मिमी पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्देउर्वरित तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा : शहरातील रस्ते जलमय