अर्जुनी - मोरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. दुसऱ्या डोसचे लसीकरण वेगाने केले जात आहे. गेल्या एक ते दीड महिन्यात लस साठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे लसीकरणात अडथळे आले होते. मात्र, शुक्रवारी (दि. २०) चान्ना - बाकीट आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत बोरटोला येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यात गावातील महिला - पुरुष अशा ८० नागरिकांनी लस घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात आरोग्यवर्धिनी केंद्राच्या आरोग्य सेविका के. डब्ल्यू. मेश्राम, आर. डी. राऊत, आरोग्यसेवक व्ही. जे. मेश्राम यांनी लसीकरणासाठी सेवा दिली. सरपंच कुरुंदा वैद्य, गीता नारनवरे, शिक्षिका अर्चना उरकुडे, अंगणवाडी सेविका छबिला शेंडे, ज्योती मेंढे, आशा सेविका पुनम येरणे, ग्रामपंचायत परिचर सुशील येरणे यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले.
बोरटोला येथे ८० नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:33 AM