नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे दारुबंदी संदर्भात जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या व महिला मंडळी किती सजग आहेत याची प्रचिती येते. दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात.गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहिम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारुबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशा धमक्याही महिला मंडळी गावातील पुढाºयांना देतात. परिणामी आपली मते खराब होणार नाही याची काळजी घेत दोन-चार दारु विक्रेत्यांच्या विरोधात समिकरण तयार करुन गावात दारुबंदीसाठी ठराव घेण्याचा प्रयत्न करतात.जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लहानसहान ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी तंटामुक्त समिती व महिला मंडळींनी केल्याची बाब पुढे आली आहे. महाराष्ट्रशासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या शासन निर्णयात गावातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धंदे बंद पाडून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा आधार घेत तंटामुक्त समित्या व महिला मंडळींनी गावातील अवैध धंदे म्हणजे दारुला मुख्य समजून या दारुला आपल्या गावातून हद्दपार करण्याचा मानस बांधला.त्यामुळे जिल्ह्यातील ८१० गावांमध्ये दारुबंदी झाली आहे. दारु विकणाऱ्यांचे धंदे बंद करुन त्यांना गावात सुरु होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्राधान्य देण्यात आले आहे. बॉक्सआर्थिक बचत व कलह कमीदारूमुळे पैशांची नासाडी होत असून सोबतच गृह कलह वाढतात.यामुळे महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने ८१० गावातील दारूबंदी करण्यात आली. या गावातील दारू पिणाऱ्या व्यक्तींची पैशांची बचत झाली व दारूबंदी झाल्याने वादही कमी झाले.दारूबंदीमुळे गावातील वातावरण आता सुधारत आहे. मद्यप्राशन करून गावातील चौकाचौकांत धिंगाणा घालणाºयांनी मंदिराची वाट धरली आहे.२९१ गावांकडे लक्षजिल्हा दारूबंदी करण्यासाठी फक्त २९१ गावे उरली आहे. महिलांनी या गावांमध्ये कंबर कसून दारूबंदी करण्यास सुरूवात केल्यास जिल्ह्यात दारूबंदी करण्यास वेळ लागणार नाही. या गावांत दारूबंदी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन महिलांची मदत घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात ८१० गावांमध्ये दारुबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 11:27 PM
गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
ठळक मुद्देतंटामुक्त मोहिमेला पाठबळ : २९१ गावांना दारुबंदीचा ध्यास