देवानंद शहारे।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलयुक्त शिवार योजनेच्या पाठोपाठ महाराष्टÑ शासनाने शेतकºयांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतीला संरक्षीत सिंचनाची सोय व्हावी, यासाठी शेततळे बांधकामासाठी अनुदान देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७४ शेततळ्यांसाठी ८४.२४ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.जिल्ह्यात ३१ मार्च २०१७ पर्यंत एकूण १३२ शेततळ्यांसाठी ६४.०२ लाखांचे अनुदान देण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील २४ शेततळ्यांसाठी १२.४१ लाख, तिरोड्यातील २० शेततळ्यांसाठी ८.७१ लाख, गोरेगावातील २८ शेततळ्यांसाठी १३.२२ लाख, अर्जुनी-मोरगाव येथील ५ शेततळ्यांसाठी २.५३ लाख, देवरी येथील ३८ शेततळ्यांसाठी १९.१० लाख, आमगावातील ८ शेततळ्यांसाठी ३.४७ लाख, सालेकसा येथील ४ शेततळ्यांसाठी २.०५ लाख व सडक-अर्जुनी येथील ५ शेततळ्यांसाठी २.५३ लाख रूपये अनुदानाचा समावेश आहे. १ एप्रिल २०१७ ते आतापर्यंत एकूण ४२ शेततळ्यांसाठी २०.२२ लाख रूपये अनुदानावर खर्च करण्यात आले. यात तिरोडा तालुक्यातील ८ शेततळ्यांसाठी ३.६९ लाख, गोरेगावातील ४ शेततळ्यांसाठी २ लाख, अर्जुनी-मोरगाव येथील २ शेततळ्यांसाठी १ लाख, देवरी येथील २३ शेततळ्यांसाठी ११.१६ लाख व सालेकसा तालुक्यातील ५ शेततळ्यांसाठी २.३६ लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. सन २०१७-१८ मध्ये जिल्हास्तरावर बोडी व शेततळ्यांकरिता २५ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून ते वितरीत करण्यात आले. जिल्ह्यात सिंचनाच्या सोयींचा अभाव आहे. परिणामी शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. यावर मात करण्यासाठी शेततळ्यांची मदत शेतकºयांना होणार आहे. शेततळ्यांमुळे शेतातच जलसाठा होवून पाण्याची बचत होईल. त्याचा लाभ घेवून उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे. हाच योजनेचा मुख्य उद्देश आहे.शेततळ्यांसाठी प्राप्त अर्ज‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यातून एकूण ९०५ अर्ज आले. यापैकी पात्र शेतकरी ५१३ असून तांत्रिकदृष्ट्या जागा योग्य असलेले शेतकरी ४४२ आहेत. यात उद्दिष्टाला अनुसरून तालुकास्तरीय समित्यांनी ३८० अर्जांना मंजूरी दिली. तर १० अर्ज समितीसमोर ठेवणे बाकी आहे. कार्यारंभ आदेश दिलेल्या शेततळ्यांची संख्या ३२९ असून आखणी करून दिलेल्या शेततळ्यांची संख्या ३१९ आहे. यापैकी ४९ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली आहेत.कागदपत्रेआधारकार्ड, जात प्रमाणपत्र, अर्जदाराच्या नावे सातबारा, शेततळ्यासाठी जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे बीपीएल कार्ड (अत्यावश्यक नाही), अर्जदाराचे फोटो, शेतकरी समुहासाठी १०० रूपयांचे स्टॅम्प पेपर आदी.
१७४ शेततळ्यांसाठी ८४.२४ लाखांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:46 AM
जलयुक्त शिवार योजनेच्या पाठोपाठ महाराष्टÑ शासनाने शेतकºयांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली.
ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे : तालुकास्तरीय समितीकडून ३८० अर्जांना मंजुरीशेतकºयाकडे कमीत कमी ०.६० हेक्टर शेतजमीन हवीवैयक्तीक शेतकरी या योजनेसाठी पात्रलाभार्थ्याची शेतजमीन शासनाच्या अटीशर्तीनुसारतांत्रिकदृष्ट्या पात्र असावीशेतकºयांच्या समुहालासुद्धा एका सामूहिकशेततळ्याचा लाभ दिला जावू शकतो.