शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात आढळले ८६ सारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 8:50 PM

गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्दे६० ठिकाणी गणना : सेवासंस्थेसह २२ पथकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. १० जून रोजी २२ पथकांनी केलेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्यात ३४ ते ३८ व बालाघाट जिल्ह्यात ४४ ते ४८ सारसांची संख्या आढळल्याची माहिती सेवा संस्थेने दिली आहे. गोंदिया व बालाघाट या सारस स्केपमध्ये सारसांची संख्या ८६ झाली आहे.पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी प्रयत्नरत असलेल्या सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, संरक्षण प्रकल्प प्रभारी आय.आर. गौतम यांच्या मार्गदर्शनात पारंपारीक पद्धतीने सारस गणना करण्यात आली. १० ते १६ जून या दरम्यान सारस गणना करण्यात आली. जिल्ह्यातील शेत, तलाव व नदीकाठी ही गणना करण्यात आली. यांतर्गत, सतत सहा दिवस ५० ते ६० ठिकाणी २२ पथकांच्या माध्यमातून सारस गणना करण्यात आली. सारसांच्या विश्रांतीच्या ठिकाणी सकाळी ५ वाजता पासून सकाळी ११ वाजता पर्यंत वन्यप्रेमी सारसांची गणना करण्यासाठी थांबायचे. एका पथकात २ ते ३ सदस्यांचा समावेश होता.संस्थेच्या सदस्यांच्या माध्यमातून सारसांचा अधिवास, प्रजनन अधिवास व भोजनाच्या ठिकाणी भ्रमनपथाचा अभ्यास केला गेला. सारसाचा ज्या ठिकाणी अधिवास आहे त्या ठिकाणच्या लोकांना सारसाचे महत्व सांगितले गेले. मागील ४-५ वर्षापासून सेवा संस्थेद्वारे बालाघाट जिल्ह्यातही सारस संरक्षण व संवर्धनाचे काम स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडून शेतकऱ्यांच्या मदतीने करण्यात येत आहे. १२ जून रोजी अभय कोचर व अभिजीत परिहार यांच्या मार्गदर्शनात सारस गणना करण्यात आली.सारस गणनेसाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, बालाघाटचे जिल्हाधिकारी डी.व्ही. सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, बालाघाटचे वन मंडळ अधिकारी देवप्रसाद यांनी सहकार्य केले. सारस गणनेला जिल्हा प्रशासन, गोंदिया निसर्ग मंडळ, वन विभाग गोंदिया, वनविभाग बालाघाट व चंद्रपूरच्या इको प्रो संस्थेने सहकार्य केले.महाराष्ट्रात केवळ ४२ सारससारस गोंदिया, भंडारा व चंद्रपूर येथे आढळले. संपूर्ण महाराष्ट्राच्या सिमेअंतर्गत भागात सारस आढळत आहे. सन २०१७ च्या गणनेनुसार महाराष्ट्रात ३८ ते ४२ सारस आहेत. सन २०१८ च्या गणनेत सारसांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर काही सारसांचा मृत्यू देखील झाल्याचे नमूद करण्यात आले. विषबाधा व करंट लागून सारसांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात ३ सारस तर चंद्रपूर येथे एक सारस आढळला आहे.सारस गणनेत यांचा समावेशसारस गणना करणाऱ्यांमध्ये मुनेश गौतम, सावन बहेकार, अभिजीत परिहार, अभय कोचर, दुष्यंत रेंभे, अंकीत ठाकूर, शशांक लाडेकर, चेतन जसानी, मुकुंद धुर्वे, संजय आकरे, बबलू चुटे, दुष्यंत आकरे, अशोक पडोळे, प्रविण मेंढे, जलाराम बुधेवार, विशाल कटरे, कन्हैया उदापुरे, मोहन राणा, सलीम शेख, राकेश चुटे, रतीराम क्षीरसागर, पिंटू वंजारी, रूचीर देशमुख, अश्वीनी पटेल, सिकंदर मिश्रा, कमलेश कामडे, निशांत देशमुख, हरगोविंद टेंभरे, राहूल भावे, विकास महारवाडे, महेंद्र फरकुनडे, जयपाल ठाकूर, विकास फरकुंडे, विक्रांत साखरे, विजय विदानी, मधुसूदन डोये, शेरबहादूर कटरे, निखील बिसेन, रमेश नागरिकर, चंदनलाल रहांगडाले, बंटी शर्मा, डिलेश कुसराम व प्रशांत मेंढे यांचा समावेश होता.

टॅग्स :forestजंगल