लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आधारकार्ड प्रमाणीकरण झालेल्या २१ हजार ८२ शेतकऱ्यांना आत्तापर्यंत ८७ कोटी ५० लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफीस प्राप्त ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याचे काम मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे.या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते.यात जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी २२ हजार १२२ शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करण्यात आले आहे.तर उर्वरित १२१५ शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करण्याचे काम सुरू आहे.तर २१ हजार ८२ शेतकऱ्यांच्या आधारकार्ड प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफची ८७ कोटी ५० लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करुन चार ते पाच दिवसात कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया युध्द पातळीवर राबविली. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा झालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक जिल्हा बँकेचे शेतकरी खातेदार आहेत.नियमित कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार लाभनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान अनुदान देण्याची घोषणा केली आहे.यासाठी जिल्ह्यातील २३ हजार शेतकरी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे.या शेतकऱ्यांना सुध्दा लवकरच प्रोत्साहान अनुदानाचा लाभ मिळणार आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेसह पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उर्वरित १२१५ शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.- के.पी.कांबळेजिल्हा सहकार निबंधक
२१ हजार शेतकऱ्यांना ८७ कोटींची कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 6:00 AM
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफीस प्राप्त ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याचे काम मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे.या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते.यात जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
ठळक मुद्दे१२१५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक । महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना