शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

९३३४ आपादग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

By admin | Published: January 17, 2017 12:53 AM

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ८ हजार ६५ घरे आणि १ हजार २६४ गोठ्यांचे नुकसान झाले.

नैसर्गिक आपत्ती : २ कोटी ७० लाख २१ हजारांची मागणी गोंदिया : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ८ हजार ६५ घरे आणि १ हजार २६४ गोठ्यांचे नुकसान झाले. मागच्या वर्षीच्या शिल्लक अनुदानातून अतिगरजूंना शक्य ती मदत करण्यात आली, परंतु उर्वरित आपादग्रस्तांना २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. वादळ, पूर यामुळे घर, गोठे, पशूधन, रस्ते, शाळा, चावडी यासह जीवित हाणीही झाली आहे. यातील आपादग्रस्तांना, त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. सन २०१६-१७ या वर्षात नैसर्गिक आपत्तीत ८ हजार ६५ घरांचे, १ हजार २६४ गोठ्यांचे नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार हे नुकसान २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रुपयांचे आहे. गोंदिया तालुक्यात ३ हजार २५६ घरांचे नुकसान झाले असून १ कोटी ३५ लाख ३ हजार ३५० रुपयाचे नुकसान झाले. तिरोडा तालुक्यातील ९८६ घरे तर ११४ गोठे असे ३३ लाख ९४ हजार ६०० रुपयाचे नुकसान झाले. गोरेगाव तालुक्यातील १ हजार १०७ घरे व ५८ गोठ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची किंमत ३१ लाख ६० हजार ५० रुपये आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ हजार ८१८ घरे तर २० गोठ्यांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची किंमत २१ लाख १५ हजार ७५० रुपये, देवरी तालुक्यातील ३० घरे व ७ गोठ्यांचे १ लाख २ हजार ३०० रुपयाचे नुकसान झाले.आमगाव तालुक्यातील ५८२ घरे व १ हजार ५६ गोठ्यांचे ४० लाख ८० हजाराचे नुकसान झाले. सालेकसा तालुक्यातील १५३ घरे ४ गोठे असे २ लाख ९४ हजार ३०० रुपयाचे नुकसान झाले. सडक-अर्जुनी तालुक्यातील १३३ घरे १० गोठे असे ३ लाख ७१ हजार १५० रुपयाचे नुकसान झाले. या नुकसानीचा आकडा २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रुपयाचा घरात गेलेला आहे. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली. परंतु शासनाने सदर मदतीच्या रकमेचा पुरवठा केला नाही. (तालुका प्रतिनिधी)एक कोटीची मदत आपादग्रस्तांना जिल्हा प्रशासनाने जुन्या शिल्लक रकमेपैकी १ कोेटी २ लाख ८२ हजार २९७ रुपयांची मदत केली आहे. मृत व्यक्तीच्या व जखमींच्या कुटूंबीयांना मदत देण्यासाठी असलेल्या ३५ लाखापैकी १५ लाख ८२ हजार ५९७ रुपये वाटप करण्यात आले. घर, गोठे दुरूस्तीसाठी असलेल्या ४० लाखापैकी ३९ लाख ५३ हजार २०० रुपये वाटप करण्यात आले. पशुधन खरेदीसाठी ८ लाखापैकी १२ लाख १३ हजार ६०० रुपये देण्यात आले. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी २ लाखापैकी एकही खर्च झाले नाही. इतर बाबीसाठी ४५ हजार रुपये आले होते. परंतु ३५ लाख ३२ लाख ९०० रुपये खर्च करण्यात आले. आवकपेक्षा अधिक खर्च ज्या शिर्षकाखाली खर्च करण्यात आला, ती रक्कम इतर शिर्षलेखातून घेण्यात आली आहे.