विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर ही सालेकसा तालुक्यातील जवळपास ८० टक्के गाव एसटीच्या सोयीपासून दूर राहिले आहेत. त्यात आता कोरोना काळात या गैरसोयीत भर पडली आहे. तालुक्यातील ९० टक्के गाव एसटीसह इतर प्रवास सोयीपासून वंचित आहेत. त्यामुळे गावागावातील नागरिकांना एकतर स्वत:च्या वाहन सुविधा करुन घ्यावी लागते किंवा पायी प्रवास करण्यास भाग पडावे लागते. हे या भागातील वास्तव आहे. सालेकसा तालुका राज्याच्या पूर्व टोकावर असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला जोडणारा तालुका आहे. हा तालुका सोयी सुविधांच्या बाबतीत अजुनही वंचित आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अद्यापही बरेच लोक सोयी सुविधांपासून नेहमी वंचित आहे.त्यांच्या नशीबी पायी चालणे किंवा थोडाफार स्थिती सुधारली तर सायकलचा प्रवास करण्याची क्षमता आहे. अशात सर्वसामान्य लोकांचे कोणतेही काम वेळेवर किंवा त्वरित करणे अशक्य असते. अशात परिस्थितीमध्ये किमान गावापर्यंत प्रवास करण्याची सोय असणे आवश्यक आहे. पण या सुविधेचा अभाव आहे. तालुक्यात एकूण ८५ प्रमुख गावे असून इतर लहान मोठे टोले व रिठी गावे सुध्दा आहेत. ९६ हजार लोकसंख्येच्या आजघडीला तालुक्यात वास्तव्यास आहे. आमगाव खुर्द (सालेकसा) हे तालुक्यात मुख्यालयातील मुख्य बाजारपेठेचे स्थळ असून दर सोमवारी आठवडी बाजार आणि सरकारी गैरसरकारी कामासह आपल्यासाठी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील जनतेला सालेकसाला यावे लागते. परंतु तालुका मुख्यालय गाठण्यासाठी सुध्दा प्रवास सोयी नसल्याने लोकांना जास्त करुन पायी प्रवास करावा लागतो. तालुक्याला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा मुख्यमार्ग गोंदिया, आमागव, सालेकसा दरम्यान जवळपास ४२ किमी या प्रवास असून सालेकसानंतर मार्ग पुढे दरेकसा चांदसूरजवरुन डोंगरगडकडे जाताना छत्तीेसगड राज्यात जातो. अशात या मार्गावर सतत एसटीची सोय असणे आवश्यक आहे. परंतु सध्या आमगाव, सालेकसा दरम्यान दिवसातून फक्त दोन वेळा एसटी धावत असते. त्यामुळे इतर वेळेत प्रवास साधना अभावी तासनतास टॅक्सीसाठी प्रतीक्षा करावी लागते.
लग्नाचा मोसम आणि पाहुण्यांची पायपीटलग्न समारंभात दूर दूरवरील पाहुणे मंडळी आपल्या नातलगावच्या घरी मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येतात. किंवा गावातील लोक इतर गावी लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी जाताना दिसतात. परंतु मुख्य मार्गावरुन गावापर्यंत तासनतास १५-२० किमीचा पायी प्रवास करताना पाहुणे मंडळी दिसत असतात.
तालुका मुख्यालयाला जोडणारे मार्ग तालुका मुख्यालयाला इतर मुख्य गावाशी जोडणारे काही महत्वाचे मार्ग आहे. यात तिरखेडी, सातगाव, साकरीटोला, सालेकसा, हलबीटोला, गोर्रे, लोहारा, बिजेपार, सालेकसा, रोंढा, निंबा, पिपरिया, गोवारीटोला, लटोरी, बाम्हणी, खेडेपार, कावराबांध, कोटजंभूरा, नवेगाव, बाम्हणी, साकरीटोला, सावंगी, धानोली, दरबडा, बोदलबोडी, सालेकसा हे महत्वाचे मार्ग आहे. परंतु प्रवास साधनाची सोय नाही.या गावांची पायपीट कायम आमगाव, देवरी मुख्य मार्गावर साकरीटोला, कारुटोला सारखी काही दोन तीन गावे स्पर्श करीत असून साकरीटोलावरुन, कोटरा, बिजेपार मार्ग असून सुदूर गावाकडे जाण्यासाठी या मार्गाचे महत्व आहे. परंतु या सर्व रस्त्यावरील गावातील नागरिकांना मुख्य मार्गापर्यंत येण्यासाठी कसल्याही प्रकारचे वाहतुकीच्या साधनाची सोय नसल्याने पायी प्रवास करण्याशिवाय उपाय नाही. सोनपुरी, पाथरी, खेडेपारच्या नवेगाव, कोटजमूरा, मुरकुटडोह, दंडारी, टेकाटोला, विचारपूर, कोपालगड, टोयागोंदीसह व गावे, तिरखेडी, गिरोला, गांधीटोला, गोर्रे, लोहारा व इतर गावे महत्वाची व मोठी गावे असून सरळ मार्गावर असून सुध्दा या गावापर्यंत अजुनही पोहचली नाही. कहाली, निंबा, पिपरिया क्षेत्रातील पांढरी, पाऊलदौना खोलगड, बिंझली, नानव्हा या गावांची सुध्दा हिच स्थिती आहे.