नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रौढ साक्षरता अभियानाचा प्रभाव जिल्ह्यात दिसू लागला आहे.मागील दहा वर्षात ९० हजार प्रौढ नवसाक्षर झाले आहेत. आता ते कुणाच्या मदतीशिवाय आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार सहजरित्या पार पाडत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ आहे. यात ६ लाख ६१ हजार ५५४ पुरूष व ६ लाख ६० हजार ९५३ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या साक्षरतेचे प्रमाण ८४.९५ टक्के आहे. यात पुरूष ९२.०४ टक्के तर महिलांच्या साक्षरतेची टक्केवारी ७७.८९ टक्के आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रौढ साक्षरतेचे कार्यक्रम सुरू आहेत. जिल्ह्याच्या निर्मितीला १९ वर्ष लोटले तरीही जिल्ह्यात निरंतर शिक्षण कार्यालय सुरू करण्यात आले नाही. येथील कारभार भंडारावरूनच सुरू आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ५५० ग्रामपंचायतीत ११०० प्रेरक कार्यरत आहेत. मागील दहा वर्षात या प्रेरकांनी ९० हजार लोकांना साक्षर केले आहे. सालेकसा तालुक्याच्या सातगाव येथील नवसाक्षर रामजी बापू जगने (७२) यांच्या मते आता ते बँकेचा व्यवहार सहजरित्या करू शकतात. सरकारचे साक्षरता अभियान कौतुकास्पद आहे. नवसाक्षर संतकला राधेलाल मोहबे (४८) मजूरी करतात. मजुरीच्या पैश्याचा हिशेब करतात. डाकघरात जाऊन त्या पैसे जमा करतात. नवसाक्षर लीला उदेलाल साखरे (६१) ह्या सुध्दा मजुरी करतात. त्या सुध्दा हिशेब करतात. परंतु त्यांना दररोज शिकविल्या जात नाही अशी त्यांची तक्रार आहे. नवसाक्षर सुलका चिंधू सरजारे (६२) च्या मते त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. त्यांना डोळ्याने बरोबर दिसत नसले तरी सर्व गोष्टी लक्षात येतात. औषध किंवा इतर व्यवहाराचे बिल घेण्यास त्या विसरत नाहीत.साधन सामुग्रीचा अभावसातगावचे प्रेरक विनोद राधेलाल मोहबे हे डीटीएड, बीएड शिक्षक आहेत. त्यांच्या मते सातगाव येथे ३५ व साखरीटोला येथे ३८ लोक नवसाक्षर झाले आहेत. परंतु प्रौढ शिक्षा अभियानासाठी साधन सामुग्रीचा अभाव आहे. प्रौढ शिक्षणासाठी लोकांना वेळ मिळत नाही. प्रेरकांना २ हजार रूपये महिन्याकाठी असे सहा महिन्याचे मानधन दिले जाते. यामुळे प्रेरकांना त्रास होतो. हे अभियान ९० टक्के यशस्वी झाले आहे. हे अभियान ६ महिन्याऐवजी निरंतर सुरू ठेवण्याची गरज आहे.५० महिन्याचे वेतन नाहीप्रेरक संघटनेच्या सालेकसा तालुकाध्यक्ष सुजाता शिवणकर म्हणतात की, राजकारण्यांच्या दबावामुळे कामावर परिणाम पडतो. मागील ५० महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. सद्या एका महिन्याचे मानधन देण्यात आले. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बॉक्स२ लाख नागरिक निरक्षरगोंदिया जिल्ह्यातील प्रौढ साक्षरतेवर नजर टाकली असता अजूनही जिल्ह्यातील ५२ हजार ६६० पुरूष व १ लाख ४६ हजार १३६ महिला निरक्षर असल्याची बाब पुढे आली आहे. यांना साक्षर करण्यासाठी निरंतर शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
दहा वर्षात ९० हजार प्रौढ साक्षर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:35 AM
आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रौढ साक्षरता अभियानाचा प्रभाव जिल्ह्यात दिसू लागला आहे.मागील दहा वर्षात ९० हजार प्रौढ नवसाक्षर झाले आहेत. आता ते कुणाच्या मदतीशिवाय आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार सहजरित्या पार पाडत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.
ठळक मुद्दे८५ टक्के जिल्हा साक्षर : आदिवासी महिलांमध्ये झाला बदल, प्रेरकांच्या श्रमाचे फलित