शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

९२ हजार विद्यार्थ्यांना नवीन गणवेश

By admin | Published: August 18, 2015 1:51 AM

गोंदिया जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात गणवेश वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात गणवेश वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी (१५ आॅगस्ट) शाळेत गणवेशात हजर झाले. शासनाने उशिरा निधी उपलब्ध करून दिल्याने शाळेच्या पहिल्या दिवशीपासून गणवेश मिळू शकले नसले तरी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी शासनाने ३ कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपये पाठविले होते. ते पैसे सर्व तालुक्यांच्या संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना २५ जून रोजी देण्यात आले. ३० जुलैपर्यंत प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याला गणवेश द्यावेत, असे निर्देश २७ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. परंतु तरीही विद्यार्थ्याना गणवेश मिळाले नाही अशा तक्रारी येताच ३१ जुलै रोजी शिक्षण विभागाने पुन्हा पत्र काढून त्वरित गणवेश वाटप करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे गणवेश तयार करण्याच्या प्रक्रियेला गती आली.१५ आॅगस्टच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थी गणवेशात होता. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश मिळावे यासाठी शासनाने दोन महिन्याआधीच गणवेशाची रक्कम देणे अपेक्षित आहे. परंतु शासनाकडून योग्यवेळी गणवेशाची रक्कम मिळाली नाही. शाळा सुरू होण्याच्या दोन महिन्याअगोदर पैसे पाठविले तर कापडाचे दरपत्रक मागवून त्यानुसार पुढील प्रक्रिया करणे सोपे होते. कमीत कमी तीन दरपत्रक येणे गरजेचे असते. दरपत्रकानंतर पुरवठा आदेश काढावा लागते. त्यानंतर ते कापड शिवण्यासाठी पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागते. पहिल्या दिवशी मिळाले नाही तरी निदान स्वातंत्र्यदिन गणवेशात साजरा करता आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)या विद्यार्थ्यांना दिले गणवेश४जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात. याशिवाय सर्व शालेय विद्यार्थिनी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना या गणवेशांचा लाभ दिला जातो.१०० टक्के विद्यार्थ्याना गणवेश मिळाले का याबाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या नावानिशी मागवत आहोत. दुरध्वनीवरून सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता सर्व विद्यार्थ्याना गणवेश वाटप झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र विद्यार्थ्यांची यादी अजून मिळालेली नाही.- दिलीप बघेले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सर्वशिक्षा अभियान, गोंदिया. गणवेशासाठी असा लागला निधी तालुकानिधीअर्जुनी-मोरगाव३५,७३,४००आमगाव३३,२३,२००देवरी२५,१२,६००गोंदिया९०,५९,०००गोरेगाव३३,८९,६००सालेकसा२८,६७,२००सडक-अर्जुनी२८,२४,४००तिरोडा५०,७६,२००एकूण३,२६,२५,६००