अंकुश गुंडावार, गोंदिया: येथील बिरसी विमानतळावरील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड़ान अकादमी (इग्रुआ) रायबरेली केंद्रातील प्रशिक्षणार्थी क्रॉफ्टचा शनिवारी झालेल्या अपघातानंतर त्या अपघाताच्या चौकशीकरीता डीजीसीएची चमू तब्बल 22 तासानंतर गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आज रविवारला दुपारी 3 वाजता दाखल झाली.या डीजीसीएच्या चमूने बिरसी विमानतळावरील इग्रुआच्या प्रशिक्षण केंद्र व्यवस्थापकासोबतच इतर पायलट यांच्याशी व तांत्रिक विभागाच्या कर्मचारी वर्गासोबत चर्चा केली.हे डीजीसीएचे पथक उद्या सोमवारला(दि.20) एयरक्राप्ट अपघातग्रस्त झाले त्या मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाणेअंतर्गतच्या भक्कुटोला येथे जाऊन पाहणी करणार आहेत.दरम्यान सदर घटनास्थळ हे अतिनक्षलसवेंदनशिल असल्याने मध्यप्रदेश पोलिसांच्या हाँक फोर्स व स्थानिक पोलिसांच्या कोंबीग आॅफरेशननंतर घटनास्थळापर्यंत पोलीस पोचून प्रशिक्षणार्थी पायलट यांचे मृतदेह ताब्यात घेत लांजी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकेल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना त्यांचे मृतदेह सोपवण्यात आले.
प्रशिक्षकासह प्रशिक्षणार्थी घेवून दुपारी 3.00 वाजेच्या सुमारास उड्डाण भरलेल्या क्रॉफ्ट शनिवारला दुपारी 3.20 वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील किरणापूर जंगलातील भक्कुटोला जंगलात कोसळले. यात प्रशिक्षासह प्रशिक्षणार्थिचा देखील मृत्यू झाला होता. या अपघातात प्रशिक्षक पायलट मोहित ठाकूर आणि महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक व्ही. माहेश्वरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.प्रशिक्षक मोहित ठाकूर यांचा मृतदेह खडकांमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला.तर महिला प्रशिक्षणार्थीचा मृतदेह विमानातच अडकला होता.दोन पहाडाच्या मध्ये विमान कोसळले असून 100 फूट खोल ही दरी आहे.प्रत्यक्ष घटनास्थळावर पोचण्याकरीता पोलीस व गोंदिया विमानतळाच्या तपासणी चमूला 7 किमीचा रस्ता पहाडी व जंगलातून पुर्ण करावा लागला.
बालाघाट किरणापूर जिल्ह्यातील भक्कुटोला गावातील दुर्गम डोंगर आणि घनदाट जंगलात प्रशिक्षणार्थी विमान कोसळून 22 तासांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अद्यापपर्यंत महासंचालक नागरी विमान वाहतूक (डीजीसीए, मुंबई) व विमान अपघात तपास मंडळ (एएआयबी) अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत.मात्र उद्या सोमवारी ही टीम घटनास्थळी पोचणार असल्याची माहिती बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक शफिक शाह यांनी सांगितले.
वास्तविक, AAIB हे DGCA चे स्वतंत्र बोर्ड आहे, जे विमान अपघातांची चौकशी करते.विमानतळ व्यवस्थापक शहा म्हणाले की, अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स पोलिस प्रशासनाकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे.घटनास्थळी पोहोचल्यावर ब्लॅक बॉक्स देण्यात येईल, ज्यामध्ये इन्स्ट्रक्टर पायलट आणि महिला ट्रेनी पायलट यांच्यात अपघातापूर्वी झालेले संभाषण रेकॉर्ड तपासले जाईल. या बॉक्सची तपासणी केल्यानंतर अपघाताचे खरे कारण समजेल.चार्टर एअरक्राफ्ट किंवा इतर कोणत्याही विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यातील संवाद रेकॉर्ड करण्याबरोबरच त्यांचे संभाषणही विमानतळावरील डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर यंत्रात रेकॉर्ड केले जाते, अशी माहिती देण्यात आली. डीजीसीए किंवा एएआयबीच्या तपासानंतर हा अहवाल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पाठवला जाईल.उल्लेखनीय आहे की, शनिवार, 18 मार्च रोजी बिरसी विमानतळावरून उड्डाण करणारे प्रशिक्षणार्थी विमान किरणापूरच्या भक्कुटोलाच्या जंगलात कोसळले होते.
अपघातग्रस्त विमान हे सिंगल इंजिन D-41 ट्रेनी विमान असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंगल इंजिनाव्यतिरिक्त गोंदिया विमानतळावर दुहेरी इंजिन असलेले D-42 प्रशिक्षणार्थी विमानही आहे. दरवर्षी 100 हून अधिक प्रशिक्षणार्थी वैमानिक गोंदिया विमानतळावर प्रशिक्षण घेतात. यानंतर उत्तर प्रदेशातील अमेठी येथील इंदिरा गांधी नॅशनल फ्लाइंग अकादमीची टीमही या घटनेची चौकशी करण्यासाठी पोहोचणार आहे.
पायलट हिमाचल प्रदेश आणि गुजरातचे- विमानात प्रशिक्षक पायलट मोहित कौशल ठाकूर वय-24 बनीखेत जिल्हा.चंबा,हिमाचल प्रदेश येथील आहे.मोहीतचे वडील हे इंजिनियर तर आई शासकीय नोकरीत आहे. आणि महिला ट्रेनी पायलट वृषांका माहेश्वरी वय-19 रा.कछ्छ.गुजरात या होत्या.
दोघांचेही मृतदेह कुटुबियांना सोपवले- प्रशिक्षणार्थी विमान अपघातात मृत पावलेल्या दोन्ही पायलटचे मृतदेह त्यांच्या कुटुबियांना आज सायकांळी सोपवण्यात आले.मोहीतचा मृतदेह घेण्याकरीता मोहीतचे वडील व त्याचे मित्र तर वृषांकाचा मृतदेह घेण्याकरीता तिचे फुपा व नातेवाई आले होते. दरम्यान घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता व ब्लकबाॅक्सच्या तपासणीकरीता डीजीसीएची चमू उद्या सोमवारला सकाळी येत असल्याची माहिती बालाघाटचे पोलीस अधिक्षक समीर सौरभ यांनी सांगितले.