शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

‘ए टू झेड महासेल’ आगीत जळून राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 5:00 AM

सेलमध्ये घरगुती वापराच्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कपडे होते. त्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. परिणामी, तब्बल २५ ट्रीपव्दारे रात्री १० वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सेलमधील एकूणएक वस्तू जळून राख झाली व मालकाचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील श्री टाॅकीज मार्गावर असलेल्या ‘ए टू झेड महासेल’ला शुक्रवारी (दि.१८) धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. ५ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. या आगीत सेलमधील ‘ए टू झेड’ वस्तू जळून राख झाल्या आहेत.      प्राप्त माहितीनुसार, श्री टॉकीज मार्गावरील बजरंग दल कार्यालयासमोर ‘ए टू झेड महासेल’ लागला असून त्याचे मालक राधेलाल मनिराम बोपचे (रा. गोरेगाव) आहेत. सेल लागलेली इमारत भागवत मसानी व सुधीर मसानी यांच्या मालकीची आहे. शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावर असलेला कर्मचारी शुभम आत्राम (रा. अनंतपूर-यवतमाळ) याला शॉर्टसर्किटने आग लागल्याचे दिसले. तो खाली अन्य कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी आला. अन्य कर्मचारी तेथे पोहोचेपर्यंत आग परसली होती. याबाबत लगेच पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ठाणेदार महेश बनसोडे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन वाहन लगेच घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आणि लगतच्या इमारतींना आग लागण्याची शक्यता वाढल्याने गोंदियातील ६ वाहनांसह अदानी वीज प्रकल्प, गोरेगाव, आमगाव व बालाघाट येथील प्रत्येकी अशा एकूण १० अग्निशमन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सेलमध्ये घरगुती वापराच्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कपडे होते. त्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. परिणामी, तब्बल २५ ट्रीपव्दारे रात्री १० वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सेलमधील एकूणएक वस्तू जळून राख झाली व मालकाचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती कळताच घटनास्थळी माजी आ. राजेंद्र जैन, रवी ठकरानी, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. आग आटोक्यात येईपर्यंत या सर्वांनी घटनास्थळीच तळ ठोकला होता.

ते ५ जण सुरक्षित- ‘ए टू झेड महासेल’ असलेल्या इमारतीला आग लागली तेव्हा तेथे सेलमध्ये काम करणारे शुभम आत्राम, शुभम देठे (रा. यवतमाळ), अभी मुंडे (यवतमाळ), संजय गजभिये (रा. रतनारा-गोंदिया) व सतीश पटले (रा. नवाटोला-गोंदिया) आतमध्ये होते. शुभम आत्राम याला आग लागल्याचे दिसले व त्यानंतर लगेच ते बाहेर पडले. 

...तर बाजारपेठच आगीच्या विळख्यात‘ए टू झेड महासेल’ इमारतीच्या एका बाजूला मोकळी जागा असून दुसऱ्या बाजूला लागूनच कामाक्षी हॉटेलची इमारत आहे.  आगीने रौद्र रूप धारण केल्याने कामाक्षी हॉटेललासुद्धा धोका होता. शिवाय, यालाच लागून ८-१० दुकानेसुद्धा आहेत. विशेष म्हणजे, आगीचा भडका एवढा जास्त होता की, समोरच्या इमारतीलाही धोका होता. विशेष म्हणजे, आगीच्या उष्णतेमुळे तेथे रस्त्यावर उभ्या एका चारचाकी वाहनातून धूर निघत असल्याचेही कळले. अशात आग वेळीच आटोक्यात आली नसती, तर या परिसरातील अन्य इमारतींना धोका झाला असता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे ५ तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.फायर ऑडिट असूनही उपयोग नाहीशहरात आगीच्या घटना नवीन नाही.  ५-६ वर्षांपूर्वी शहरातील एका हॉटेलला आग लागून ११ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, ‘ए टू झेड महासेल’ असलेल्या इमारतीचे फायर ऑडिट झाले असूनही आगीचा भडका बघून कर्मचाऱ्यांना काहीच समजले नाही. अग्निशमन दलाचे जवानही जखमी आगीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नरत असलेले अग्निशमन दलातील डी.आर. तेलासे, मोहनीश नागदेवे, आमीर खान, शहबाज सय्यद, राहुल मेश्राम, लोकचंद भेंडारकर व छबीलाल पटले जखमी झाले. यातील कुणाचे हात  तर कुणाची पाठ व छातीही भाजल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :fireआग