शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाला पोलिसांनी वाचवले, लग्नासाठी नकार दिल्याने आले नैराश्य

By अंकुश गुंडावार | Published: November 22, 2023 8:19 PM

ही घटना बुधवारी (दि.२२) देवरी तालुक्यातील खामखुरा येथे घडली. दिपक कुमार रेनसिंह सलामे (२४) रा. खामखुरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मजनुचे नाव आहे.

देवरी : प्रेम प्रकरणातून आलेल्या नैराश्यातून मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला चिचगड पोलिसांनी मोठ्या शिथाफीने व समजूत काढत टॉवरवरुन खाली उतरविले. ही घटना बुधवारी (दि.२२) देवरी तालुक्यातील खामखुरा येथे घडली. दिपक कुमार रेनसिंह सलामे (२४) रा. खामखुरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मजनुचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील खामखुरा येथील दिपककुमार सलामे याचे छत्तीसगड येथील एका तरुणीवर प्रेम जडले. त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्धार केला. दिपकने तरुणीला लग्नाची मागणी घातली. पण त्या तरूणीने दिपकसोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकाराने दिपकला नैराश्य आले. याच नैराश्यातून बुधवारी (दि.२२) त्याने गावातील ३०० फूट उंच मोबाइल टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा प्रकार दिपकचे कुटुंबीय व गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती चिचगड पोलिसांना दिली.

माहिती मिळताच ठाणेदार शरद पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टॉवरवर चढलेल्या दिपकशी मोबाइलव्दारे संपर्क साधून त्याच्यासह संवाद साधून त्याची टॉवरवरुन खाली उतरण्यासाठी मनधरणी केली. तसेच त्याचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. सलग चार तास प्रयत्न केले. पण तो तरुण काही एक ऐकत नव्हता. ही बाब ठाणेदार शरद पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी दिपकचे प्राण वाचवायचे ठरवून त्याला सतत मोबाइलवर बोलण्यात व्यस्त ठेवले. त्याला स्वत:च्या जिवाचे बरे वाईट करायचे नाही असे सांगून त्यांनी त्याला विश्वासात घेतले. इतर आवश्यक असलेल्या वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध करुन दिल्या. सामाजिक कार्यकर्ते, तसेच पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मदतीने त्या दिपकला चार तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप खाली उतरविले. दिपक टॉवरवरुन खाली उतरल्यानंतर त्याचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पोलिसांनी काळजीपूर्वक हाताळले प्रकरणठाणेदार शरद पाटील यांनी दिपकची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी त्याच्याशी जवळपास अर्धा ते पाऊन तास मोबाइलवरुन संवाद साधून त्याचे समुपदेशन केले. तसेच त्याला विश्वास दिला. चार तास हा सर्व प्रकार चालला. यानंतर दिपक टॉवरवरुन खाली उतरला. चिचगड पोलिसांनी अतिशय काळजीपूर्वक ही घटना हाताळली.

प्रेम प्रकरणातून आले नैराश्यदिपकचे छत्तीगड राज्यातील एका तरुणीवर प्रेम जळले होते. तिच्या प्रेमात तो आंधळा झाला होता. त्या तरुणीच्या प्रेमात तो अधिकच वाहत गेला होता. त्याने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली. पण त्या तरुणीने त्याला नकार दिला. याचा दिपकच्या मनावर गंभीर परिणाम होवून तो नैराश्यात गेला. याच नैराश्यातून त्याने मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलल्या जाते. 

टॅग्स :Policeपोलिसmarriageलग्न