शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

‘आदेश आले का जी’ची ! प्रतीक्षा संपणार केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 5:00 AM

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाचे पूर्वीचे काढलेले आरक्षण कायम ठेवायचे की ते नव्याने काढायचे, यावरून जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले होते; पण ग्रामविकास विभागाला यावर निर्णय देण्यास मागील दोन महिन्यांपासून वेळच मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मागील दोन महिन्यांपासून जि.प. अध्यक्ष आणि पं.स. सभापती पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे; पण अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही, त्यामुळे निवडून आलेले सदस्य मागील दोन महिन्यांपासून केवळ विजयाच्या प्रमाणपत्रापुरतेच मर्यादित ठरत आहे. तर काहीजण ग्रामविकास विभागाकडून आदेश आले का? अशी विचारणा जिल्हा निवडणूक विभागाकडे करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाचे पूर्वीचे काढलेले आरक्षण कायम ठेवायचे की ते नव्याने काढायचे, यावरून जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले होते; पण ग्रामविकास विभागाला यावर निर्णय देण्यास मागील दोन महिन्यांपासून वेळच मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मागील दोन महिन्यांपासून जि.प. अध्यक्ष आणि पं.स. सभापती पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. १९ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पंधरा ते वीस दिवसात अध्यक्ष आणि सभापतीची निवड होणे अपेक्षित होते; पण ग्रामविकास विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे या निवडणुका लांबणीवर डल्या असृून, निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून हे सदस्य केवळ विजयाच्या प्रमाणपत्रापुरतेच मर्यादित ठरले आहे. वेळकाढूपणाचे धोरण कशासाठी - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदासाठी पूर्वी जे आरक्षण काढण्यात आले होते, तेच कायम राहणार, हेसुध्दा स्पष्ट झाले आहे. मात्र, यानंतरही ग्रामविकास मंत्रालयाने आपला निर्णय जिल्हा निवडणूक विभागाला कळविण्यासाठी एवढे वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिण्याचे कारण कळण्यास मार्ग नाही. विकासकामांच्या नियोजनाला सदस्य मुकले - जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच माध्यमातून ग्रामविकासाच्या कामाचे नियोजन केले जाते. त्यासाठी मार्च महिना हा महत्त्वपूर्ण समजला जातो. याच महिन्यात वर्षभराच्या कामांचे नियोजन करून बजेट तयार केले जाते. यात जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मात्र, अध्यक्षाची निवड न झाल्याने जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. परिणामी विकासकामांचे बजेट तयार करण्यापासून या सदस्यांना मुकावे लागले. 

सदस्य आंदोलनाच्या पावित्र्यात - दोन दिवसांपूर्वीच लगतच्या भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांनी अध्यक्ष आणि सभापती पदाची निवडणूक लांबणीवर टाकल्याने संताप व्यक्त केला होता. तसेच विजयाचे प्रमाणपत्र गळ्यात घालून शासन आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला होता. ती भूमिका आता जिल्ह्यातील सदस्य घेण्याच्या भूमिकेत आहे. लोकप्रतिनिधी गप्प का ?- मागील दोन महिन्यांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुका रखडल्या असताना जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि नेते यांनी यावर केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे या नेत्यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणात रस राहिला नाही का? असा सवाल जिल्हावासीयांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद