आमगाव : कुबड्यांचा आधार घेऊन सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस व भाजपच्या प्रशासनात पंचायत समितीच्या कर्मचारी वसाहतीची स्थिती जर्जर झाली आहे. कार्यरत कर्मचारी इतर ठिकाणी भाड्याने वास्तव्यास आहेत. फक्त दोन कर्मचारी सरकारी वसाहतीत असल्याचे समजते. कर्मचारी वसाहतीची हालत एवढी जर्जर झाली आहे की, त्या ठिकाणी कार्यालय मोठ्या थाटाने सुरू आहेत. उघड्यावर पडलेल्या वसाहतीत कृषी उपज साहित्य ठेवले आहे. मात्र मागील १० वर्षापासून जर्जर झालेल्या वसाहतीचा जिर्णोद्वार अजूनपर्यंत झाला नाही. उलट कार्यरत कर्मचारी वसाहती उपलब्ध नसल्याने गोंदियावरून येणे जाणे करित आहेत. त्या कर्मचाऱ्यांचा येण्याचे किंवा जाण्याचे निश्चित वेळापत्रक नाही. पंचायत समितीमधील सदस्य व जनप्रतिनिधी या समस्येला वाचा फोडण्याकरिता क्रियाशिल नाहीत. वसाहती एवढ्या जीर्ण आहेत की एखाद्या वेळी लाकडी फाटा तुटला किंवा मोडला तर मोठी दुर्घटना टाळता येत नाही. वसाहतीला जीर्णोद्वाराकरीता प्रशासनकर्त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही. वसाहतीला मोठे छिद्र पडले आहेत. कवेलु निघाले आहे फाटे तुटले आहेत. मात्र योजनाबद्ध पध्दतीने या जीर्ण झालेल्या वसाहतीचा उध्दार करण्याकरीता आतापर्यंत जनप्रतिनिधी समोर आलेले दिसत नाही. या जिर्ण वसाहतीत किती कार्यालय सुरू आहेत, अधिकारी कोण? लाभार्थ्यांनी कुणाकडे जावे याची माहिती उपलब्ध नाही किंवा साधे फलक सुध्दा लावले नाही. केवळ सत्ता चालविणे हाच कुबड्यावर चालणाऱ्या पक्षाचा उद्देश असल्याने अजब-गजब कारभार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
आमगाव पं.स.ची वसाहत झाली जर्जर
By admin | Published: June 04, 2016 1:39 AM