शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

कार्यमुक्त कंत्राटी एएनएमचे आजपासून ‘आमरण उपोषण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:47 PM

राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरवून ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी ४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरवून ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी ४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. तरिही त्यांच्या मागण्या दुर्लक्षीतच राहिल्याने त्यांनी शनिवारपासून (दि.१६) आमरण उपोषण सुरू करीत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व पोलीस निरीक्षकांना दिले.रिक्त जागांनुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना अनेकदा देण्यात आले होते. मात्र तीन वर्षे लोटूनही आरोग्य विभागाने त्या कंत्राटी एएनएम यांना कामावर घेतले नाही. या अन्यायाविरूद्ध कंत्राटी बेरोजगार एएनएमनी अनेकदा जिल्हा परिषदेत पायपीट केली. बेमुदत साखळी उपोषणही सुरू केले. दरम्यान पालकमंत्र्यांनी मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले. परंतु त्यांनी दिलेले आश्वासनही हवेतच विरल्यासारखे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी शनिवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे.मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या चकरा मारत त्यांनी जि.प. पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले. मात्र त्यांच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या मार्गदर्शनात जि.प. कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.आता त्यांचे साखळी उपोषण ‘आमरण उपोषणात’ परिवर्तीत होत आहे. आता तरी जिल्हा परिषद प्रशासन न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रंजिता सार्वे, डॉली पालांदूरकर, शीला ठाकरे, शेफाली श्यामकुवर आदिंचा समावेश आहे.