लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा नगर पंचायतची घोषणा झाल्यापासून मागील तीन वर्षांपासून आमगाव खुर्दला नगर पंचायतमध्ये समावेश करण्याबाबत शासनाची तळ्यात की मळ्यात ही भूमिका अखेर स्पष्ट झाली आहे. आमगाव खुर्दचा सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करुन नगर पंचायतची हृदवाढ करण्यात येईल. येत्या चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असे शासनातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. मंगळवारी (दि.३) शासनाच्या निर्णयाची लेखी प्रत तहसीलदार प्रशांत सांगोळे यांनी उपोषणकर्त्या गावकऱ्यांना दिली. त्यानंतर उपोषण मागे घेत गावकऱ्यांनी गावातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.२०१५ ला शासनाने तालुक्याच्या स्थळातील मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीना नगर पंचायतचा दर्जा देण्याचे आदेश काढले. त्या आदेशाची अंमलबजावणी करीत सालेकसा ग्रामपंचायतला सुद्धा नगर पंचायत घोषित करुन येथील ग्रामपंचायत कमिटी बर्खास्त करण्यात आली व प्रशासक बसवून तहसीलदाराकडे कामकाज सोपविण्यात आले होते. परंतु सालेकसा तालुका स्थळाच्या नेहमी एक घोळ कायम राहिला. सालेकसा तालुका मुख्यालयाच्या नावाने चालणारी सर्व शासकीय निमशासकीय व खासगी संस्था, कार्यालय बाजारपेठ सर्वच्या सर्व आमगाव खुर्दच्या हद्दीत चालत आहेत. सालेकसा ग्रामपंचायत ही मुख्य बाजारपेठेच्या बाहेरच्या परिसरात आहे. मुक्काम सालेकसा नावाचे गाव सुद्धा तालुका मुख्यालयापासून ३ कि.मी. अंतरावर आहे. अशात आमगाव खुर्दला वगळून नगर पंचायत करणे अनेकांना स्विकार्य वाटत नव्हते. सुरुवातीला आमगाव खुर्दवासीयांनी आमगाव खुर्दच्या नावाने नगर पंचायत करावी अशी मागणी केली. परंतु तालुक्याच्या नावाने चालणाºया ग्रामपंचायतलाच नगर पंचायतचा दर्जा देण्याचे शासनाचे आदेश असल्याने आमगाव खुर्दवासीयांना यात यश आले नाही. तेव्हा त्यांनी आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. दरम्यान जुलैमध्ये नगर पंचायत निवडणुका घेण्याची निवडणूक अधिसुचना आयोगाची अधिसुचना निघाली. अशात आमगाव खुर्द येथील ब्रजभूषण बैस आणि वासुदेव चुटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा उच्च न्यायालयाने निवडणुकीवर स्थगिती देत आमगाव खुर्दला समाविष्ट करण्यसाठी योग्य ती कारवाई करण्याचा सल्ला दिला. सर्वत्र नगर पंचायतीच्या निवडणूका आहेत. मागील दोन वर्षापासून आमगाव खुर्दवासी पंचायतीसाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत राहिले. परंतु यश मिळत नव्हते. ग्राम निवडणूक आयोगाने चार महिन्यात अधिसुचना काढून आमगाव खुर्दवासीयांचा ही विचार न करता सालेकसा नगर पंचाययच्या निवडणूका घेऊन नगर पंचायतची स्थापना केली. नगराध्यक्ष आणि नगरसेवक लोकशाही मार्गाने निवडून आले. परंतु हक्काची मागणी करुन सुद्धा आमगावखुर्दला वगळण्यात आले. असे समजून गावकरी पुन्हा या निणर्या विरोधात एकत्र आले. पुन्हा न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाच्या माध्यमातून नोटीस बजाविण्यात आली. दरम्यान गावकºयांनी उपोषण सुरु करुन दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांनी उच्च न्यायालयात निवेदन करीत आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करण्याची माहिती देत येत्या चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे गावकºयांनी उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.नवनिर्वाचित नगर पंचायतचे काय?आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन न्यायालयात दिले. अशात येत्या चार महिन्यानंतर सालेकसा नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व नगर सेवकांचा कार्यकाळ पूर्ण होणार की त्यांना बडर्तफ करणार. याबाबत चर्चेला उधाण आले असून जनतेचे आपल्याला पाच वर्षासाठी निवडून दिले. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण करुन काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी होत आहे.
आमगाव खुर्दचा सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:23 PM
सालेकसा नगर पंचायतची घोषणा झाल्यापासून मागील तीन वर्षांपासून आमगाव खुर्दला नगर पंचायतमध्ये समावेश करण्याबाबत शासनाची तळ्यात की मळ्यात ही भूमिका अखेर स्पष्ट झाली आहे.
ठळक मुद्देगावकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश : चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार