शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

आमगावचा तिढा; ७ ग्रा.पं.संभ्रमात

By admin | Published: June 13, 2017 12:52 AM

नोव्हेंबर २०१७ मध्ये आमगाव तालुक्यातील ३९ ग्रा.पं. तर डिसेंबर महिन्यात एका ग्रा.पं. ची निवडणूक घेण्यात येणार आहे.

४० ग्रा.पं.च्या निवडणुका : तालुका प्रशासनाने मागितले मार्गदर्शननरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नोव्हेंबर २०१७ मध्ये आमगाव तालुक्यातील ३९ ग्रा.पं. तर डिसेंबर महिन्यात एका ग्रा.पं. ची निवडणूक घेण्यात येणार आहे. परंतु आमगाव नगर परिषद की नगर पंचायत यासाठी मागील दोन वर्षापासून प्रकरण रेंगाळत पडल्यामुळे याचा परिणाम इतर ग्राम पंचायतीवर होत आहे. सर्वच ग्राम पंचायतींचा नगर परिषदेला विरोध असल्याने आतापर्यंत शासनानेही पुढची भूमिका घेतली नाही. परिणामी यासंदर्भात सात ग्राम पंचायत व तालुका प्रशासन संभ्रमात आहे. आमगाव तालुक्यातील ४० ग्राम पंचायतींच्या सार्वत्रीक निवडणुका आहेत. त्यातील ३९ ग्राम पंचायतच्या निवडणुका नोव्हेंबर २०१७ या वर्षात आहेत. त्यात गिरोला, भोसा, सितेपार, बुराडीटोला, टेकरी, बोदा, टाकरी, ननसरी, डोंगरगाव, सुपलीपार, भजीयापार, बनगाव, नंगपूरा, करंजी, सुरकुडा, धामनगाव, मोहगाव, कातुर्ली, बोथली, जवरी, दहेगाव, मानेगाव, किडंगीपार, गोरठा, खुर्शीपार, खुर्शीपारटोला, पाऊलदौना, तिगाव, बघेडा, कवडी, फुक्कीमेटा, पानगाव, बोरकन्हार, पदमपूर, सावंगी, बाम्हणी, पिपरटोला, माल्ही, बिरसी या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर डिसेंबर महिन्यात रिसामा या ग्राम पंचायतीची निवडणूक आहे. निवडणूक विभागाने या ४० ग्राम पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. परंतु आमगावला नगर पंचायत कि नगर परिषद ही बाब अद्याप स्पष्ट न झाल्याने आमगावच्या नगर परिषदेच्या परिसरात येणाऱ्या आठ गावांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. ही संभ्रामाची स्थिती नागरिकांमध्येच नाही तर तालुका प्रशासनामध्येही आहे. या ४० ग्राम पंचायतींच्या निवडणूका जर झाल्या आणि त्यानंतर नगर परिषद किंवा नगर पंचायतीचा निर्णय झाला तर या गावांपुढे अचण निर्माण होणार आहे. शासनाचा निवडणुकीवर खर्च होणारा पैसाही वाया जाणार आहे. नियमाप्रमाणे आमगाव नगर परिषद होऊ शकत नाही म्हणून १५ हजार नागरिकांनी या संदर्भात आक्षेप नोंदविला होता. सात ग्राम पंचायतींनी आमगावला नगर परिषदेचा दर्जा देऊ नये आम्हची ग्राम पंचायत ठेवा, नगर पंचायत आमगाव करा असा ग्रामसभेचा ठराव दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नगर विकास विभागाला आक्षेपांची कागदपत्रे पाठविण्यात आली होती. शासनाने आमगाव १२ फेब्रुवारी २०१५ ला नगर पंचायत जाहीर केले. त्यानंतर आमगावला नगर परिषद हवी म्हणून जनहित याचीका टाकण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही बाब शासनावर सोपविली. शासनाने ६ जानेवारी २०१७ ला उदघोषणा करून आक्षेप मागविले होते. यासंदर्भात १५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते. आमगाव जर नगर परिषद झाली तर पदमपूर, रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडंगीपार, बनगाव, माल्ही या गावांचा त्यात समावेश राहील असे ठरविण्यात आले होते. परंतु आक्षेपामुळे शासनानेही अद्याप आमगाव नगर पंचायत की नगर परिषद यासंर्भात कसलाही निर्णय घेतला नाही. शासनाने यासंदर्भात पुन्हा जिल्हा परिषदेला ठराव मागीतला. जिल्हा परिषदेने पुन्हा ग्राम पंचयतींची मते जाणण्यासाठी ठराव मागीतला. यात नगर परिषदेला विरोध दर्शविणारे ठराव घेण्यात आले. शासनाने आमगाव संदर्भात न घेतलेल्या निर्णयामुळे संभ्रमाची स्थिती आहे.निवडणूक आयोगाला पत्रआमगाव नगर पंचायत गठित करण्याबाबत शासन अधिसूचना १२ फेब्रुवारी २०१५ अन्वये प्रसिध्द करण्यात आली. १० फेब्रुवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका क्र.२०/२०१५ दाखल केली होती. परंतु न्यायालयाने १२ फेब्रुवारी २०१५ ची अधिसूचना रद्द ठरविली. यामुळे आमगाव नगर परिषदमध्ये समाविष्ट होणाऱ्या आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, पदमपूर, किडंगीपार, बिरसी व माल्ही या ग्राम पंचायती मिळून न.प. गठित करण्याबाबत उदघोषणा ६ जानेवारी २०१७ रोजी प्रसिध्द करून आक्षेप मागविले होते. आलेले आक्षेप ५ मे २०१७ अन्वये नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. आमगाव नगर परिषद गठित करण्याबाबत कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. तर नगर परिषद क्षेत्रात आमगाव, बनगाव, पदमपूर, बिरसी माल्ही, किडंगीपार व रिसामा या मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायती आहेत. ग्राम पंचायतीचे क्षेत्र येत असल्यामुळे सदर ग्राम पंचायतीचे प्रभाग रचना व आरक्षण निश्चीत करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे पत्र जिल्हाधिकारी सामान्य यांनी ८ जून २०१७ रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पाठविले आहे.जांभूरटोला होणार नवीन ग्राम पंचायतआॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रा.पं. मध्ये पाऊलदौनाही गट ग्राम पंचायत आहे. सदर ग्राम पंचायतीची मुदत ११ नोव्हेंबर २०१७ ला संपत आहे. ग्राम पंचायत पाऊलदौना ही गठीत होऊन पाऊलदौना व जांभूरटोला दोन ग्राम पंचायती स्थापन होणार आहे. विघटन होणाऱ्या पाऊलदौना व जांभूरटोला यांचे प्रभाग रचना, आरक्षण कार्यक्रमासंदर्भातही संभ्रम आहे. बनगावात एक वॉर्ड, दोन सदस्य संख्या वाढली आहे. बघेडा येथील दोन सदस्य वाढले आहेत.