शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
"अशा घोषणा लोकांना आवडणार नाहीत"; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
3
"काही मशिनमध्ये गडबड होण्याची शक्यता! असं परदेशी माणूस म्हणतोय"; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
4
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
5
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
6
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
8
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
9
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
10
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
11
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
12
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
13
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
14
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
15
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
16
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
17
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
19
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
20
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

अबब... आजपासून नवतपा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:32 AM

गोंदिया : वर्षभरात सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांना नवतपा म्हटले जात असून मंगळवारपासून (दि.२५) हा नवतपा लागत आहे. आता सर्वाधिक ...

गोंदिया : वर्षभरात सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांना नवतपा म्हटले जात असून मंगळवारपासून (दि.२५) हा नवतपा लागत आहे. आता सर्वाधिक तापणारे दिवस म्हटल्यानेच जिवाला धडकी भरत असून घाम फुटू लागतो. मात्र, यंदाचा नवतपा तापवणारा नव्हे तर सामान्य वातावरणातच निघून जाणारा दिसत आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने या नवतपात ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

उन्हाळा म्हटले की, घामाच्या धारा सुटत असून धडकीच भरते. कडक उन्हात घराबाहेर पडणे जीवघेणेच ठरत असून कामकरी लोकांना मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते. अशात उन्हाळा लवकर संपावा अशीच कामना सर्व करतात. विशेष म्हणजे, मे महिन्यातील उन्ह अंगाला भाजून सोडणारे असते व त्यातच नवतपा येतो. नवतपा म्हणजे सर्वाधिक तापणारे ९ दिवस. या ९ दिवसांत सूर्यदेव सर्वाधिक आग ओकतो, असे बोलले जाते व यामुळेच नवतपा ऐकताच धडकी भरते.

मात्र, यंदाचा नवतपा तापवणारा न राहता सामान्य वातावरणातच निघून जाणार असे दिसत असून हवामान खातेही असाच अंदाज व्यक्त करीत आहे. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच ढगा‌ळ वातावरण व पावसाने हजेरी लावल्याने चांगलाच दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आतच नोंदले जात आहे. त्यात आता नवतपातील पुढच्या दिवसांत काही दिवस ढगा‌ळ वातावरण व त्यातच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच, नवतपा आता असाच निघून जाणारा दिसतो. त्यानंतर ७ जूनपासून मान्सून येणार असल्याने नवतपा थंडगार निघून जावा, अशी कामना सर्वच करीत आहेत.

--------------------------

जिल्ह्याचे तापमान ३९.८ डिग्री

यंदा उन्हा‌ळा सरत आला असून मे-हीटमध्येही जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आतच नोंदले जात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ४० डिग्री पार करून तापमान जात असल्याने घराबाहेर निघणेही कठीण होते. मात्र, यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासून ढगाळ‌ वातावरण व पावसामुळे तापमान ४० डिग्रीच्या आतच आहे. सोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३९.८ तर किमान २६.५ एवढे नोंदण्यात आले आहे.