अमरचंद ठवरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : गावातील दारिद्र्य रेषेखालील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाखो रुपयाचे अनुदान राशी थेट घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करते. सध्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनांच्या माध्यमातून निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना टप्या-टप्प्याने अनुदानाची राशी वितरित केली जाते. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना अनुदान राशीची प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्यातरी घरकुल बांधकामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने रमाई घरकुल आवास योजना राबविली जात आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना १ लाख ३० हजाराचे अनुदान दिले जाते. सन २०१८-१९ मध्ये रमाई आवास योजने अंतर्गत ८४३ लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले होते.त्यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांनी १५९ घरकुलाचे बांधकाम पुर्णत: केले असल्याची माहिती आहे. उर्वरित मंजूर घरकुल अनुदानाच्या रक्कमे अभावी रखडले आहेत. घरकुल बांधकाम निर्माणाधीन कार्याला ब्रेकच लागल्याचे चित्र तालुक्यात आहे.घरकुल मंजूर झालेले लाभार्थी दूरवरुन येऊन पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या पायऱ्या झिजवून निराश होवून घराची वाट धरतात. घरबांधकाम करण्याची योग्य काळ-वेळ असताना पैशाअभावी घरकुलाचे बांधकाम बंद ठेवण्याशिवाय कोणताही पर्यायच लाभार्थ्यांसमोर उरलेला नाही. अनुदान केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा लाभार्थी करताना दिसत आहे.सन २०१९-२० मध्ये रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत तालुक्याला ७०० घरकुलाचा उद्दिष्ठ देण्यात आले होते.त्यातील ४८० लाभार्थ्यांच्या अर्जांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पैकी १०२ लाभार्थ्यांना आॅनलाईन मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. २२२ लाभार्थ्यांची यादी मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त गोंदियाला सादर केली आहे.निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी करारनामे केले असून अद्यापही घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ताच मिळाला नसल्याची ओरड आहे. समाजातील इतर मागास प्रवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत क्रमवार पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जात असल्याने सध्या अत्यंत गरजू व वंचित लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून दुरावत असल्याचे चित्र आहे. सन २०१९-२० मध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत २ हजार १०१ लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आल्याची माहिती आहे.यातील १ हजार ६० निवड झालेल्या लाभार्थ्यांना २० हजार प्रमाणे पहिला अनुदानाचा लाभार्थ्यांच्या बँकेच्या बचत खात्यावर पाठविण्यात आले.घरकुल बांधकामाची प्रगती पाहून फक्त ४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता वळात केला आहे. तालुक्यातील घरकुल बांधकामाच्या निर्माणाधीन कार्याची प्रत्यक्ष माहिती घेवून लाभार्थ्यांना बांधकामाविषयी मार्गदर्शन करुन अनुदान राशिचे वेळोवेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी तालुक्यात १० ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यरत आहे. या योजनेला गती देण्यासाठी निधीचा बुस्टरडोज आवश्यक आहे.रमाई आवास रखडलीअनुसूचित जातीसाठी राखीव असणाºया अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सत्तेतील आमदार असलेले प्रशासकीय अनुभव पाठिशी असणारे लोकप्रतिनिधी रमाई आवास योजना अंतर्गत घरकुल निर्माणााधिन कार्यात मिळणाऱ्या अनुदानासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार का? असा प्रश्न तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा होत आहे.निवड झालेले घरकुल लाभार्थी सध्यातरी अनुदानापासून वंचित आहेत. अनुदानाची राशी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून वितरित करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.एक जागरुक लोकप्रतिनिधी म्हणून घरकुलाचे अनुदान लाभार्थ्यांना मिळवून देऊन घरकुलाचे कामाला गती दयावी असे जनमानसाकडून बोलल्या जात आहे.
अनुदानाअभावी ‘घरकुल’बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 6:00 AM
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने रमाई घरकुल आवास योजना राबविली जात आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना १ लाख ३० हजाराचे अनुदान दिले जाते. सन २०१८-१९ मध्ये रमाई आवास योजने अंतर्गत ८४३ लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले होते.त्यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांनी १५९ घरकुलाचे बांधकाम पुर्णत: केले असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देरमाई आवास योजना अंधातरी : घरकुल निर्माणाधीन कार्याला ब्रेक , योजनेला हवाय निधीचा डोज