गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत १० व ११ ऑक्टोबर २०१२ दरम्यान आरोपी पवित्र उर्फ मोनू उर्फ विक्की नरेंद्र मेश्राम रा. छोटा गोंदिया याने एका महिलेला आपल्या दुचाकीवर बसवून तिला तिच्या स्वगावी न सोडता गुदमा परिसरात नेऊन तिच्या पोटावर चाकूने वार करून जखमी केले होते. याप्रकरणाची तक्रार त्या महिलेने नोंदविल्यानंतर आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३६३, ३६४, ३०७, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश औटी यांनी सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून आरोपी विक्की नरेंद्र मेश्राम याला ३ वर्ष ६ महिने तसेच २०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून ॲड. पुरुषोत्तम आगाशे यांनी बाजू मांडली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने न्यायालयीन कामकाजासाठी सहाय्यक फौजदार आत्माराम टेंभरे यांनी काम पाहिले.
महिलेस जखमी करणाऱ्या आरोपीला साडेतीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:20 AM