तिरोडा : घरात शिरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिरोडा न्यायालयाने आरोपीला १ वर्ष कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ५ डिसेंबर २०२० रोजी घडलेल्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी (दि. ७) निर्णय सुनावला आहे.
शंकर इसाराम हटवार (रा. कोयलारी, तिरोडा) याने पीडित महिलेच्या घरात मागील दारातून प्रवेश करून हात पकडून विनयभंग केला होता. याप्रकरणी तिरोडा पोलिसांत भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सहायक फौजदार पृथ्वीराज जांभूळकर यांनी केला व आरोपी विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी तिरोडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विकास कारेमोरे यांनी आरोपीला १ वर्ष कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा सुनावली आहे.