लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या रेल्वे न्यायाधीशांचे कॅम्प कोर्ट गोंदिया रेल्वे स्थानकात घेण्यात आले. तसेच विविध प्रवासी गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात एकूण १६५ प्रवाशांवर कारवाई करून ७० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.गोंदियाच्या रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या कॅम्प कोर्टमध्ये एकूण ८८ प्रवासी रेल्वे नियमांचे उल्लंघन करताना आढळले. तसेच विविध रेल्वे स्थानकांवर व रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान राबवून ४७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे एकूण १६५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७० हजार रूपयांचे दंड वसूल करण्यात आले आहे.तसेच एका प्रवाशाला १० दिवसांसाठी कारागृहात पाठविण्यात आले आहे. सदर कारवाई ३ आॅगस्ट रोजी करण्यात आली. याशिवाय बालाघाट, तुमसर, भंडारा, वडसा येथेसुद्धा तपासणी अभियान राबविण्यात आले. यात ४७ प्रवाशांवर कायदेशिर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले व दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या मार्गदर्शनात गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा दलाने केली.डीआरएमने केले जबलपूर-नैनपूर मार्गाचे निरीक्षणदपूम रेल्वे अंतर्गत विविध परियोजनेवर कार्य सुरू आहे. यात नागपूर मंडळातील जबलपूर-नैनपूर मार्गावरील स्थानकांचे निरीक्षण व समनापूर-नैनपूर आमान परिवर्तन कार्यांचाही समावेश आहे. ही सर्व कामे वेळेवर पूर्ण व्हावी, यासाठी डीएमआर शोभना बंदोपाध्याय यांनी निरीक्षण करून आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासोबत नागपूर मंडळातील अनेक अधिकारी उपस्थित होते. बंदोपाध्याय यांनी जबलपूर-नैनपूर मार्गावरील गढा, ग्वारीघाट, शिकारा, बिनैकी, घंसोर स्थानकांचे निरीक्षण केले. तसेच प्रवासी सुविधा, खानपान व्यवस्था, स्वच्छता व इतर कार्यांचा आढावा घेतला. बांधकाम विभागाद्वारे होणाºया आमान परिवर्तन कार्याचासुद्धा आढावा घेतला व बांधकाम अधिकाºयांशी चर्चा केली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६५ प्रवाशांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:29 AM
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या रेल्वे न्यायाधीशांचे कॅम्प कोर्ट गोंदिया रेल्वे स्थानकात घेण्यात आले. तसेच विविध प्रवासी गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात एकूण १६५ प्रवाशांवर कारवाई करून ७० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ठळक मुद्दे७० हजारांचा दंड वसूल : रेल्वे न्यायाधीशांचे कॅम्प कोर्ट व तपासणी अभियान