लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या मार्गदर्शनात बुधवारी (दि.२८) सकाळी १० ते दुपारी १ वाजतापर्यंत राबविण्यात आलेल्या आॅपरेशन आॅल आऊटमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८२० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.जिल्ह्यात दरवर्षी १५० व्यक्ती रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायककल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचा अवकाळी मृत्यू होतो.वाहन चालक प्राणास मुकू नये, यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. पोलिसांनी शहर आणि ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती करुन देखील याकडे वाहन चालक दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे पोलीस विभागाने पहिल्यांदा १७ नोव्हेंबरला आॅपरेशन आॅल आऊट अभियान राबविले. त्यानंतर पुन्हा दुसरे आॅपरेशन आॅल आऊट २८ नोव्हेंबरला सकाळी १० ते दुपारी १ वाजता या तीन तासात राबविण्यात आले.यात ३०५ वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. तर १११ चारचाकी चालकांनी सीटबेल्ट बांधले नव्हते. एक वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवित होता.रस्त्यावर धोकादायक वाहने ठेवणाºया ८ वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एक अवैध प्रवासी तर इतर ३९४ इतर प्रकरणे असे एकूण ८२० वाहन चालकांकडून २ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर धोकादायक वाहन रस्त्यावर उभा करणाºया आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आॅपरेशन आॅल आऊटमध्ये ८२० चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:15 PM
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे.
ठळक मुद्देहेल्मेट सक्ती मोहीम : सीट बेल्टचा वापर न करणे भोवले