नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डिसेंबर महिन्यात कामगार आयुक्त कार्यालय व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाकडून करण्यात आलेल्या बालकामगार सर्वेक्षणात एक हजार २९६ बालकामगार आढळल्याची माहिती पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बालकामगार आढळले परंतु एकाही आस्थापनेवर कारवाई झाली नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.कुणीही शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाने प्रगत शैक्षणीक महाराष्ट्राची प्रभवीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरीबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या. प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार असल्यामुळे त्यांना शिक्षण घेणे आवश्यक आहे. सर्वेक्षण झाले नसल्याने २ वर्ष पूर्ण झालेल्या बालकामागाराला विशेष प्रशिक्षण केंद्रातून नियमाप्रमाणे नियमित शाळेत दाखल करावे लागते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून गोंदिया जिल्ह्यातील १६ बाल संक्रमण विशेष प्रशिक्षण केंद्र बंद आहेत.यावर जिल्ह्यातील २०० गावांत डिसेंबर महिन्यात सर्वेक्षण करून आठही तालुक्यातून बालकामगार पकडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यात ९ ते १४ वर्षे वयोगटातील ४२६ मुले व ३७० मुली असे एकूण ७९६ तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३६९ मुले व १३१ मुली असे एकूण ५०० बालकामगार पकडण्यात आले.बालकामगारांचे सध्या १६ प्रशिक्षण केंद्र बंदगोंदिया शहरातील गोंडीटोला, संजयनगर मुर्री, गड्डाटोली, गौतमनगर, भीमनगर, यादव चौक, सुंदरनगर, कुडवा, छोटा गोंदिया, बाबाटोली, मुरकूटडोह दंडारी-३, काचेवानीटोला, मुंडीकोटा, अदासी, तिरोडा तालुक्यातील नवरगाव व तिरोडा न.प. येथील बालसंक्रमण शाळा बंद आहेत. मागे झालेल्या सर्वेक्षणात गड्डाटोलीतील १८, गौतमनगर १५, यादव चौक १९, सुंदरनगर १९, कुडवा ११, बाबाटोली ८, मुरकूटडोह दंडारी-३ मधील ५, काचेवानीटोला ६, मुंडीकोटा १५, भिमनगर ११ व छोटा गोंदियातील ३९ असे १६६ बालकामगार बेपत्ता होते.म्हणे, होईल बालकामगारांची वर्गवारीडिसेंबर महिन्यात पकडण्यात आलेल्या बालकामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोणती मुले बालकामगार आहेत आणि कोणती मूले बालकामगार नाहीत याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे आता त्या शोधलेल्या बालकांत आता कोण बालकामगार आहे याचा पुन्हा शोध घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानंतरच यापैकी कोण बालकामगार ही माहिती पुढे येईल.
१२९६ बालकामगार आढळूनही कारवाई शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 6:00 AM
जिल्ह्यातील २०० गावांत डिसेंबर महिन्यात सर्वेक्षण करून आठही तालुक्यातून बालकामगार पकडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यात ९ ते १४ वर्षे वयोगटातील ४२६ मुले व ३७० मुली असे एकूण ७९६ तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३६९ मुले व १३१ मुली असे एकूण ५०० बालकामगार पकडण्यात आले.
ठळक मुद्दे२०० गावांतील सर्वेक्षण : प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी खटाटोप तर नाही ना ?