लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे सावट दिसत असून अशात तालुक्यातील एकाही गावात पाण्याची कमी होऊ नये. तालुक्यात पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागल्यास यापेक्षा खेदजनक बाब राहणार नाही. यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी वर्तमान स्थितीत कार्यरत व निर्माणाधीन पाणी पुरवठा योजनांना लवकरात लवकर कार्यान्वीत करण्याचे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले.तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे येत्या फेब्रुवारी २०१८ ते जून २०१८ या काळातील संभाव्य पाणी टंचाईला बघता त्याचे नियोजन करण्यासाठी आयोजीत आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीला तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्राम सचिव, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सरपंच व उपसरपंचांनी त्यांच्या गावातील पाणी पुरवठा योजनांसंंबंधी अडचणींचा खुलासा केला. यावर आमदार अग्रवाल यांनी, पाण्याचे स्त्रोत निवडताना झालेल्या चुकीमुळे शासनाच्या कोट्यवधींच्या योजना अयशस्वी ठरत असल्याचे सांगत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर असंतोष व्यक्त केला. त्यांनी मजिप्रा व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला तालुक्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या योजनांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून आवश्यक दुरूस्तीची कामे नियोजीत वेळेत करण्याचे निर्देश दिले.तसेच पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनाही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींत आवश्यक बोअरवेल्सची सविस्तर यादी तयार करण्याचे तसेच सर्व आवश्यक बोअरवेल्सचे बांधकाम पाणी टंचाई योजनंतर्गत जिल्हाधिकाºयांना प्रस्तावीक करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता शर्मा यांनी मौजा पांजरा, सतोना, लोधीटोला, चंगेरा, लोहारा, रापेवाडा, नवरगाव, पोवारीटोला, मोगर्रा, आवरीटोला येथे मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रीया सुरू असल्याचे सांगीतले. तसेच ग्राम रायपूर, ढाकणी, दांडेगाव, तेढवा, लंबाटोला, हिवरा, काटी, खमारी, लहीटोला येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत योजनांचे बांधकाम सुरू केले जात असल्याचे सांगीतले.सभेला जिल्हा परिषद सभापती विमल नागपूरे, सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सिमा मडावी, शेखर पटेल, माजी सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनित मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, खंडविकास अधिकारी टेंभरे, शंकर टेंभरे, गोविंद तुरकर, मोहपत खरे, धनवंता उपराडे, जीवन चव्हाण, केशव तावाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.१५ दिवसांत वीज जोडणीचे आदेशबैठकीत आमदार अग्रवाल यांनी, तालुक्यातील ग्राम सिवनी, चारगाव, घिवारीसह अन्य योजनांचे बांधकाम पूर्ण होऊनही त्यांना वीज जोडणी नसल्याचे प्रकार मांडत १५ दिवसांत अशा योजनांना वीज जोडणी देण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना दिले. यावर वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता दखने यांनी १५ दिवसांत वीज जोडणीचे काम करून देण्याचे आश्वासन दिले.
पाणी पुरवठा योजनांना कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 9:43 PM
कमी पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे सावट दिसत असून अशात तालुक्यातील एकाही गावात पाण्याची कमी होऊ नये. तालुक्यात पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागल्यास यापेक्षा खेदजनक बाब राहणार नाही.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पाणी पुरवठा योजनांचा घेतला आढावा