परसवाडा : केंद्र व तत्कालीन राज्य सरकारने मागील काळात केलेल्या कामांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. गरजूंना विविध योजनांची माहिती देऊन त्यांची अडचण दूर करण्याची गरज आहे. तसेच येत्या निवडणुका लक्षात घेत, आता कार्यकर्त्यांनो, हेवेदावे सोडून कामाला लागा, असे आवाहन माजी आमदार हेमंत पटले यांनी केले.
तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या बुथप्रमुख, शक्तीप्रमुख, विस्तारप्रमुखांच्या आढावा सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, बाजार समिती सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, जिल्हा महामंत्री मदन पटले, युवा मोर्चा अध्यक्ष ओम कटरे, शहरअध्यक्ष स्वानंद पारधी, विजय डिंकवार, डॉ. बसंत भगत, उमा हरोडे, चतुर्भूज बिसेन, रजनी कुंभरे, मेघा बिसेन, शशी कला मेश्राम, चंद्रकला कटरे, राजेश गुणेरीया, अशोक असाटी, मनोहर बुध्दे, खुमेश्वरी बघेले, पिंटू रहांगडाले, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन करून आभार भाऊराव कठाणे यांनी मानले.