गोंदिया : प्रत्येक कार्यकर्त्यासोबत पक्ष भक्कमपणे उभा आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी संघटन बळकटीकरणासह सर्वसामान्यांच्या हितांना प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडवाव्या व प्रत्येकापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवावी, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी (दि.२२) घेण्यात आलेल्या आवश्यक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर होते. याप्रसंगी शिवणकर, आमदार मनोहर चंद्रिकापुरे व डॉ. खुशाल बोपचे यांनी, संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियता वाढवून शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना प्राथमिकता द्यावी, असे सांगितले. सभेला विनोद हरिनखेडे, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, रमेश ताराम, किशोर तरोणे, केतन तुरकर, अशोक सहारे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, लोकपाल गहाणे, केवल बघेले, प्रेम रहांगडाले, डाॅ. अविनाश काशीवार, सी.के. बिसेन, कमल बहेकार, कैलास पटले, मनोज डोंगरे, आशा पाटील, सुशीला भालेराव, दुर्गा तिराले, रजनी गौतम, माधुरी नासरे, रफीक खान, किरण बंसोड, नामदेव डोंगरवार, गोपाल तिवारी, टिकाराम मेंढे, राजू एन. जैन, परबता चांदेवार, प्रमिला गाडव, अंजू बिसेन, कुंदा दोनोडे, विनायक शर्मा, छाया चव्हाण, कल्पना बहेकार, कविता रहांगडाले, लता रहांगडाले, आशा पिल्लारे, रजनी गिऱ्हेपुंजे, मंजू डोंगरवार, शशिकला टेंभूर्णे, लक्ष्मण चंद्रिकापुरे, सुधीर साधवानी, संजीव रावत, प्रदीप जैन, उमेंद्र भेलावे, सुनील पटले, शैलेंद्र वासनिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.