शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

उपक्रमांनी सजली जि.प.ची कोडेलोहारा शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:22 AM

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की ‘नको रे बाबा’ असे म्हणणाऱ्यांना तिरोडा तालुक्यातील कोडेलोहाराच्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच चपराक दिली आहे. नागझिरा अभयारण्यालगत असलेली जिल्हा परिषद शाळा कोडेलोहारा शाळा गुणवत्ता असो वा लोकसहभाग, स्पर्धा असो वा उपक्रम सर्वच बाबतीत परिपूर्ण आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा इंग्रजीतून संवाद : शिक्षकांचे प्रेरणादायी कार्य

हितेश रहांगडाले ।लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की ‘नको रे बाबा’ असे म्हणणाऱ्यांना तिरोडा तालुक्यातील कोडेलोहाराच्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच चपराक दिली आहे. नागझिरा अभयारण्यालगत असलेली जिल्हा परिषद शाळा कोडेलोहारा शाळा गुणवत्ता असो वा लोकसहभाग, स्पर्धा असो वा उपक्रम सर्वच बाबतीत परिपूर्ण आहे.तिरोडा तालुक्यातील मुख्यालयापासून २० कि.मी. अंतरावर अगदी नागझिरा अभयारण्याच्या काठाशी वसलेल्या आदिवासी व मागासवर्ग बहुल कोडेलोहारा गाव. गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. व्यवसाय बुरडकाम, बीडी काम व रोजीकाम. त्याचाच प्रभाव लोकांवर पडलेला होता. परंतु शिक्षकांनी त्यात प्रेरणेची ज्योत पेटवून शाळा घडविली आहे.१९५० ला शाळेच्या स्थापनेपासून येथे सातवीपर्यंत वर्ग सुरू आहेत. नव्याने प्री प्रायमरी वर्गही सुरू आहेत. आमचे शिक्षण, समाजाचे रक्षण असे बीद्रवाक्य असलेल्या कोडेलोहारा शाळेत मुख्याध्यापक डी.जी.टेंभुर्णेसह सहा शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील प्रत्येक भिंत बोलकी, प्रत्येक वर्गात इ लर्निंग सुविधा आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणक साक्षर आहे. शाळा विविध उपक्रमांनी नटलेली आहे. त्यात मी आयएएस होणार, संडे स्कुल, एक कॉल होमवर्कसाठी, मी इंग्रजी बोलणार, वृक्षांचे वाढदिवस, स्टुडंट आॅफ द विक असे वर्षभर चालणारे उपक्रम घेतले जातात. सण, उत्सव आणि कार्यक्रम होणाºया प्रासंगिक उपक्रमांनी विद्यार्थी अधिकच सक्रीयपणे शाळेत रममाण होतात. शाळेतील विद्यार्थी उपस्थिती व प्रगतीसाठी शिक्षक-पालक संपर्क ‘एक कॉल’ मोहिमेद्वारा चालविला जातो. छोटे वाक्य, प्रश्न, उत्तरे येथील विद्यार्थी सहज इंग्रजीतून व्यक्त करतात. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दर शनिवारला इतर वर्गशिक्षकांमार्फत केले जाते. विद्यार्थ्यांत स्वच्छतेची आवड निर्माण करण्यासाठी ५ एस प्रणालीचा वापर केला जातो.शाळेला अनेक पुरस्कारकोडेलोहारा शाळेने परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात चांगला नावलौकिक केले असून आजवर येथे सुमारे ३७०० व्यक्तींनी भेट दिली आहे. शाळेने विविध स्पर्धा व उपक्रमात सहभागी होऊन पुरस्कार मिळविले आहेत. २०१७-२०१८ मध्ये गावची शाळा, आमची शाळा उपक्रमात एक लाख रुपयाचा तालुका प्रथम, शिष्यवृत्ती परीक्षेत ७ विद्यार्थी पात्र ठरले आहे. आॅल इंडिया क्वालिटी गुड्स सेमीनार नागपूर येथे उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल शाळेला गौरविण्यात आले आहे. लोकसहभागातून जमविलेल्या रकमेतून शाळेत सुमारे तीन लाख रुपयांची कामे करण्यात आली आहेत.सुट्यातही लागतात अध्ययन वर्गया शाळेत येथे वर्षभर अध्ययन कार्य चालते. रविवारला संडे स्कुल, अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध नवनवीन बाबी शिकविल्या जातात. ऐवढेच नव्हे तर दिवाळी सुटीतही शाळेत विविध उपक्रम राबवून नियमित वर्ग घेण्यात आले.शाळेच्या विकासासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरीत, विस्तार अधिकारी एम. डी. पारधी यांचे मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक डी.जी. टेंभुर्णे, शिक्षक दुर्योधन शेंदरे, परमानंद रहांगडाले, लिलाधर बघेले, जे.एम.भोंगाडे, मानकर,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी परिश्रम घेतात.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा