लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : लोधी समाजाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश लोधी सभा महामंत्री राधेश्याम नागपुरे यांनी खा. कुकडे यांना निवेदन देवून लोधी समाजाला केंद्रीय मागास वर्गाच्या सूचिमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा केली.निवेदनानुसार, सन २००४ मध्ये राज्य मागासवर्ग सूचिमध्ये लोधी समाजाचा समावेश करण्यात आला. पण १४ वर्षे झाल्यानंतरही केंद्राच्या मागासवर्ग सूचिमध्ये समावेश करण्यात आला नाही. याची मागणी करीत राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचे समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सोडून, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगाना, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आदी राज्यांत लोधी समाजाचा राज्य तथा केंद्राच्या मागासवर्ग सूचिमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील समाजाचा केंद्राच्या मागासवर्ग सूचिमध्ये समावेश नसल्यामुळे केंद्राच्या नोकरीपासून समाजातील मुले वंचित राहात आहेत. तसेच आरक्षणाच्या सुविधेपासूनही त्यांना मुकावे लागत आहे.तसेच बालाघाट रोडवर कटंगी येथे लोधी समाज भवन बणून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु मुख्य रस्त्यापासून भवनापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे ये-जा करण्यात अडचण येत आहे. या रस्त्यासाठी १५ लाख रूपयांची मागणी करण्यात आली. त्यावर खासदारांनी १० लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच ओबीसीच्या केंद्रीय सूचिमध्ये समावेश करण्यासाठी खा. प्रफुल पटेल, माजी खा. नाना पटोले यांना सोबत घेवून समस्या मार्गी लावण्याबाबत विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पुनाजी लिल्हारे, महामंत्री राधेश्याम नागपुरे, उपाध्यक्ष पांडुरंग मुटकुरे, समाजभवन समिती अध्यक्ष पन्नालाल शहारे, सचिव झनकलाल ढेकवार, भंडारा जिल्हाध्यक्ष अनंतलाल दमाहे, पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, चैनलाल मसरके, उरकुडा दमाहे, दादा पटेल, राजू दमाहे, बालचंद दमाहे, हरिराम कटरे, श्यामसुंदर नागपुरे, चैतरामसिंह नागपुरे उपस्थित होते.
केंद्राच्या मागासवर्ग यादीत समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:24 AM
लोधी समाजाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश लोधी सभा महामंत्री राधेश्याम नागपुरे यांनी खा. कुकडे यांना निवेदन देवून लोधी समाजाला केंद्रीय मागास वर्गाच्या सूचिमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा केली.
ठळक मुद्देनिवेदनातून मांडल्या समस्या : लोधी समाजाने केला कुकडे यांचा सत्कार