लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : येरंडी गावात पाटाचे काम झाले. हे काम एकूण १५ दिवस चालले. १५ दिवसांपैकी फक्त एक मस्टर म्हणजे ५ दिवसांचे पैसे मजुरांच्या खात्यात जमा झाले. परंतु बाकी दिवसांचे रोहयो कामाचे पैसे अद्याप जमा झाले नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या येरंडी गावात सदर काम करण्यात आले. हे काम लहान कालव्याचे होते. काम पूर्ण होवून आता एक महिना होत आहे. पण दहा दिवसांच्या मजुरीचे पैसे अद्यापही जमा करण्यात आले नाही. काम झाले की आठ-दहा दिवसात पैसे जमा होतात. पण मजुरांचे पैसे जमा न झाल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.रोहयोचे काम सुरु करण्यासाठी मजुरांकडून विविध गोष्टी पूर्ण करवून घेतल्या. संयुक्त खाते नको, एकाचे खाते द्या, मग आधार लिंक करा, मोबाईल लिंक करा, नेमक्याच बँकेचे खाते द्या असे त्रासदायक काम करण्यास भाग पाडले. हे सर्व झाल्यानंतरही पैसे वेळेवर जमा होत नाही. पैसे जमा न होण्याचे कारण काय? मस्टर पंचायत समितीला गेले की नाही की रोजगार सेवकच या कामास दांडी मारतात. पुरेशा आवश्यक बाबी समजावून सांगत नाही, अशा शंकाकुशंका मजूर व्यक्त करीत आहेत. रोजगार हमी योजनेचे काम करूनही मजुरांना पैसे मिळत नसतील तर कुटुंबाचे उदरनिर्वाह कसा करायचा, असे अनेक प्रश्न मजुरांसमोर उपस्थित निर्माण झाले आहेत.सदर समस्यांची संबंधित विभागाने चौकशी करून उर्वरित मजुरी त्वरित बँक खात्यात जमा करण्याची मागणी येरंडी येथील मजूर व नागरिकांनी केली आहे.
रोहयो कामाचे शिल्लक पैसे जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:18 PM
येरंडी गावात पाटाचे काम झाले. हे काम एकूण १५ दिवस चालले. १५ दिवसांपैकी फक्त एक मस्टर म्हणजे ५ दिवसांचे पैसे मजुरांच्या खात्यात जमा झाले. परंतु बाकी दिवसांचे रोहयो कामाचे पैसे अद्याप जमा झाले नाही.
ठळक मुद्देचकरा मारणे सुरुच : येरंडी येथील मजुरांची मागणी