शासन निर्णय वाऱ्यावर : विद्यार्थ्याना व्यसनापासून रोखण्यासाठी खटाटोपगोंदिया : मुलांना शिकवितांना शिक्षक तंबाखू, खर्रा,बिडी, सिगारेट, पान तर मद्याचेही सेवन करतो. त्यामुळे विद्यार्थी वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचे पाहून शिक्षण मंत्र्याने व्यसनाधीन शिक्षकांची शोध मोहीम घेण्याचे आदेश दिले. १८ डिसेंबर २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना यासंबधी पत्र देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील एकाही व्यसनाधिन शिक्षकावर कारवाई करण्यात आली नाही.विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढत आहे. ५ ते २० वयोगटातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाधिन असल्याचे महाराष्ट्र सरकारने मान्य केले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोरच व्यसन करीत असल्याने विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहे, असे गृहीत धरून व्यसनाधिन शिक्षकांना व्यसनमुक्त करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी आधी व्यसनाधिन असलेल्या शिक्षकांची यादी तयार करा, त्यांना व्यसनमुक्त होण्याचा सल्ला द्या, व्यसनमुक्त शिक्षक होण्यासाठी त्यांच्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करा असे सूचविले. वारंवार मार्गदर्शन करूनही व्यसन न सोडणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न देता त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या संबधी शिक्षण सहसंचालकांनी संपूर्ण राज्यभरातील व्यसनाधीन शिक्षकांची माहिती मागविली होती. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून व्यसनाधिन असलेल्या शिक्षकांची माहिती शासनाने मागविली होती. परंतु किती शिक्षक व्यसनाधिन आहेत याची माहिती जि.प.च्या शिक्षण विभागाला आली नाही. अथवा कोणत्याही व्यसनाधिन शिक्षकावर कारवाई केली नाही.जे शिक्षक तंबाखू, खर्रा, दारू, बिडी, सिगारेटचे सेवन करतात अश्या शिक्षकांसंबधात कठोर निर्णय घेत त्यांना पदोन्नती न देणे, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार न देणे, त्यांना शासनाच्या सोयीसुविधा पासून वंचीत करणे, ज्या शिक्षकांना व्यसनमुक्त राहण्याचे मार्गदर्शन केल्यानंतरही ते ऐकत नसतील अश्या शिक्षकांवर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु या संदर्भात कसलीही कारवाई करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)
व्यसनाधीन शिक्षक बडतर्फ झालेच नाही
By admin | Published: February 20, 2017 12:50 AM