गोंदिया : व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राच्या संयुक्तवतीने ग्राम उमरी येथे व्यसनमुक्ती महिला मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच अरुणा बडगे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून समाज सेविका सविता बेदरकर, व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प संचालक हसनकुमार कोटांगले, समाजसेवक मोहन वाघ, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनीलकुमार दाते, पोलीसपाटील रंजिता रामटेके, भिवराम पटले, ग्रामपंचायत सदस्य शामकला वरखडे उपस्थित होते. यावेळी व्यसनमुक्तीवर कलापथकाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. संचालन सुनिता पटले यांनी केले. आभार हरिचंद कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पुष्पा कोल्हे, भूमेश्वरी तुरकर, ललीता पटले, शांता पंधरे, मीना मस्से, रंजिता पागोडे उपस्थित होते. या मेळाव्याला गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
उमरी येथे व्यसनमुक्ती महिला मेळावा
By admin | Published: October 09, 2016 12:47 AM