यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या कलासंचालनालयाला एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही चित्रकला परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यामुळे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत असे जाहीर केले होते. यावर शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी आक्षेप घेऊन चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावेत अशी मागणी करत पाठपुरावा सुरू ठेवला होता. विद्यार्थ्यांना चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण मिळणार किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नांची दखल घेऊन शासनाने एलिमेंटरी, इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेऊन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाचे शिक्षक भारती संघटना शाखा अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांना या निर्णयापासून दिलासा मिळाला आहे.
एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:20 AM