शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

१ जूनपासून अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे सुरू होणार; तीन गाड्यांचे वेळापत्रक निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 9:52 PM

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १ जून २०२० पासून गैर श्रमिक नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगोंदिया, तिरोडा व आमगाव येथे थांबामार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १ जून २०२० पासून गैर श्रमिक नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ह्या अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे गाड्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक, नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तीन रेल्वे गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याच्या व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.गाडी क्रमांक ०२८३३ अहमदाबाद - हावडा ही गाडी तिरोडा येथे १९.२५ वाजता पोहोचून १९.२७ वाजता सुटेल.१९.५८ वाजता गोंदिया येथे पोहोचून २० वाजता गोंदिया येथून निघेल. आमगाव येथे २०.१५ वाजता पोहोचून २०.१७ वाजता निघेल.गाडी क्रमांक ०२८३४ हावडा - अहमदाबाद ही गाडी १६.११ वाजता आमगाव येथे पोहोचेल. तेथून ती १६.१३ वाजता सुटेल.१६.४१ वाजता गोंदिया येथे आगमन व तेथून ती १६.४६ वाजता निघेल.तिरोडा येथे १७.०६ वाजता पोहोचेल व तेथून १७.८वाजता पुढील प्रवासासाठी निघेल.गाडी क्रमांक ०२८०९ मुंबई-हावडा विशेष रेल्वे १३.०८ वाजता गोंदिया येथे पोहोचेल. तेथून १३.१३ वाजता सुटेल.गाडी क्रमांक ०२८१० हावडा-मुंबई विशेष रेल्वे गोंदिया येथे १२.०२ वाजता पोहोचून १२.०४ वाजता निघेल.गाडी क्रमांक ०२०७० गोंदिया - रायगड जन्मशताब्दी एक्सप्रेस दुपारी १५ वाजता गोंदिया येथून सुटेल तर गाडी क्रमांक ०२०६९ रायगड - गोंदिया जन्मशताब्दी एक्सप्रेस दुपारी १३.२५ वाजता गोंदिया येथे पोहोचेल. तरी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. प्रवाशांनी त्यांच्या मूळ गावी पोहोचण्याकरीता वेळापत्रकानुसार पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून प्रवास करावा. सदर रेल्वेची तिकिटे फक्त आय.आर.सी.टी.सी च्या संकेतस्थळावर अथवा ऑनलाईन पद्धतीने ई-तिकीट स्वरूपात मिळतील.रेल्वे स्टेशनवर कोणतीही तिकिटे उपलब्ध होणार नसल्यामुळे रेल्वेस्टेशनवर अनावश्यक गर्दी टाळावी.ज्या प्रवाशांचे ई-तिकिट झाले आहे त्यांनाच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांची तिकीट निश्चित आहे, त्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या पूर्वी दीड ते दोन तास अगोदर रेल्वे स्टेशनवर पोहोचावे. सर्व प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड -१९ ची लक्षणे आढळणार नाही त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांनी प्रवास करतांना आपल्यासोबत कमीत कमी साहित्य घेऊन प्रवास करावा. सर्व प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांनी स्टेशनवर आणि गाडीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.सर्व प्रवाशांनी शक्यतो आरोग्य सेतू प्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. प्रवाशांनी प्रवास करतांना स्वत:चे भोजन व पाणी सोबत घ्यावे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे