लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला (निंबा) येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एकूण १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत अनेक वर्षापासून पदवीधर शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. याच शाळेत एक सहायक शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे तात्पुरते समायोजन दुसऱ्या शाळेत करण्यात येत आहे.या शाळेत वर्ग ६ व ७ ला अनेक वर्षापासून केवळ एकच पदवीधर शिक्षक शिक्षण देत आहे. परिणामी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या अतिरीक्त सहाय्यक शिक्षकांचे तात्पुरते समायोजन दुसऱ्या शाळेत न करता मूळ शाळेतच पदविधर शिक्षक म्हणून करण्याची मागणी पालक व गावकºयांनी केली आहे.या अतिरिक्त सहायक शिक्षकाचे समायोजन मूळ शाळेतच पदवीधर शिक्षक म्हणून करण्यात यावे. या मागणीचे निवेदन खंडविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती यांना पालक व गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यातर्फे देण्यात आले. जर शिक्षण विभागाने या अतिरिक्त सहायक शिक्षकाचे तात्पुरते समायोजन मुळ शाळेतच पदविधर शिक्षक म्हणून केले नाही तर आम्ही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद करु असा इशारा पालक व गावकºयांनी दिला आहे.
शिक्षकाचे समायोजन मूळ शाळेतच करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:57 AM
गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला (निंबा) येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एकूण १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत अनेक वर्षापासून पदवीधर शिक्षकाची एक जागा रिक्त आहे.
ठळक मुद्देपालकांची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन