आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासन लोककल्याणाच्या विविध योजना अमंलात आणते. परंतु त्या योजनांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पाहेचविण्याचे काम प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे असते. समाजातील अखेरच्या घटकापर्यंत लोक कल्याणकारी योजना पोहचविण्याचे आपले काम राहील. प्रशासन व जनता यातील असलेले अंतर कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया गोंदियाचे नवनियुक्त मुख्य कार्यपालन अधिकारी आर. राजा दयानिधी यांनी व्यक्त केली आहे.मुकाअ दयानिधी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली. त्यांनी लोकमतशी बोलताना ते म्हणाले गतीमान प्रशासन करण्याची आपली पहिली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. लोकांच्या सेवेसाठी आपण आहोत नागरिकांच्या प्रत्येक तक्रारी निवारणासाठी आपण तत्पर राहणार आहोत. जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जाणाऱ्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे म्हणाले. चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी व एकात्मीक आदिवासी प्रकल्प संचालक म्हणून यापूर्वी काम पाहिले. अवघ्या २८ वर्षाच्या वर्षाच्या वयात त्यांना पहिले मुख्य अधिकारी म्हणून काम करण्याची संधी गोंदियात मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.पहिल्याच दिवशी चांगल्या कार्याचा सत्कारजिल्हा परिषदेत चांगल्या कार्याचा सत्कार करण्याचा पायंडा त्यांनी पहिल्याच दिवशी रचला. २ डिसेंबर रोजी गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वंदना गोवर्धन कोवे (३८) रा. बोंडगाव या प्रसूतीसाठी गेल्या. त्या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसताना त्यांनी त्या गरोदर महिलेची गुंतागुंंतीची प्रसूती यशस्वीरित्या केली. त्यामुळे कंत्राटी आरोग्य सेविका मंजूषा बहेकार यांना जिल्हा परिषदेला बोलावून सायंकाळी सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत मंजूषाला प्रशस्तीपत्र देऊन दयानिधी यांनी सत्कार केला.
प्रशासन व जनतेतील दुवा म्हणून काम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:55 PM
शासन लोककल्याणाच्या विविध योजना अमंलात आणते. परंतु त्या योजनांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पाहेचविण्याचे काम प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे असते.
ठळक मुद्देआर. राजा.दयानिधी : गतिमान प्रशासन ही आपली जबाबदारी