शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

१९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 5:00 AM

कोरोना आजारामुळे राज्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन ग्राम विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ५४५ ग्रामपंचायती असून यापैकी १९१ ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे.

ठळक मुद्दे३८ विस्तार अधिकाऱ्यांवर जबाबदारी : शासनानचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूमुळे उद्भवणाºया संसर्गजन्य आजाराने आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी आणि राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. याच अनुषंगाने राज्यातील प्रस्तावित निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेता कोरोना संपेपर्यंत शासनाने ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ५४५ पैकी १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. शासनाचे पत्र प्राप्त होताच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.कोरोना आजारामुळे राज्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन ग्राम विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ५४५ ग्रामपंचायती असून यापैकी १९१ ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे.जुलै महिन्यात २० ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे. ऑगस्ट महिन्यात १४४ ग्रामपंचायतीच्या कालावधी संपत आहे.सप्टेंबर महिन्यात २१ ग्रामपंचायतीचा कालावधी, नोव्हेंबरमध्ये सहा ग्रामपंचायतीच्या कालावधी अशा एकूण १९१ ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक सद्या घेण्यात येणार नाही. परंतु पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. गोंदिया तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत, तिरोडा तालुक्यातील २०, आमगाव २२, सालेकसा ९, देवरी २९, गोरेगाव २६, सडक-अर्जुनी १९,अर्जुनी-मोरगाव २९ अशी एकूण १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून बसविण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची संख्याही मोठी असायला पाहिजे होती.परंतु गोंदिया जिल्ह्यात फक्त ३८ विस्तार अधिकारी असल्यामुळे एकऐका विस्तार अधिकाऱ्यावर पाच ते सहा ग्रामपंचायतीचा भार येणार आहे.सहा महिन्यात १४३१४ ग्रामपंचायती संपेल मुदतमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींवर नजर टाकल्यास आतापासून डिसेंबर २०२० पर्यंत १४ हजार ३१४ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यात नागपूर विभागातील १५२५ ग्रामपंचायती, कोकण ८१३, पुणे २ हजार ८८५, अमरावती २ हजार ४७३, नाशिक २ हजार ५०६ व औरंगाबाद ४ हजार ११२ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे.सरपंचानाच संधी द्याकोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता गावस्तरावर सरपंचांनी उत्तम कामे केलीत. कोरोनाचा कालावधी त्यांना काम करण्यासाठी कमी पडल्यामुळे निवडणूक होईपर्यंत योद्धा असलेल्या सरपंचांना सदर ग्रामपंचायती सांभाळण्याचा अधिकार द्यावा. शासनाने निवडणूक कालावधी संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त न करता मुदत संपलेल्या ग्रामपंचयतीच्या सरपंचानाच कारभार सांभाळण्याची मूभा द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा जि.प.सदस्य गंगाधर परशुमकर यांनी केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत